‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखले जाते. समीर चौगुले हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. ते नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करत असते. आज त्याने त्याच्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
समीर चौगुलेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. समीर चौगुलेच्या बायकोचे नाव कविता चौगुले असे आहे. यात त्याने त्याचा आणि बायकोचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने छान कॅप्शन दिले आहे.
सोनाली कुलकर्णी हनिमूनसाठी मॅक्सिकोमध्ये गेलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?
“बायको, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ….आयुष्याच्या मार्गावर प्रवास करताना “थांब… पुढे धोक्याचे वळण आहे”…”पुढे अपघाती क्षेत्र आहे” ..”वेग कमी कर” हे सातत्याने सांगत आलीस…. मी तुला काय देऊ. सगळं तूच तर दिलंयस मला. आसमंतात मावणार नाही इतकं प्रेम मात्र मी देऊ शकतो….वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप धन्यवाद”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
समीर चौगुलेने शेअर केलेला ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टखाली कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.