संजय दत्त गेली अनेक वर्षे त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. गेले काही दिवस तो त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. आता अशाच एका त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाल्याचे समोर आले आहे.
संजय दत्त सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हे शूटिंग बेंगळुरूजवळ सुरू आहे. आज बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या दरम्यान या बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना स्फोट झाला आणि संजय जखमी झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ॲक्शन डायरेक्टर डॉ. रवि वर्मा यांच्या ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटासाठी एक ॲक्शन सीन बसवत होते. बॉम्बस्फोट झाला आहे असा एक सीम यावेळी चित्रीत होणार होता. मात्र त्यावेळी खरोखर एक स्फोट झाला आणि संजयचे कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले.
हेही वाचा : कॅन्सरवर मात, वयाच्या ६३ वर्षी संजय दत्तचा जबरदस्त फिटनेस; व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर लगेचच संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याच्या दुखापतीची बातमी कळताच त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. या चित्रपटात तो खालनायकाची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.