मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतंच संतोष जुवेकरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत संतोष जुवेकर आणि अभिनेता मनोज बाजपेयी याच्यांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी वेबसीरिजचा आघाडीचा कलाकार आहे. त्याची फॅमिली मॅन ही वेबसीरिज चांगलीच गाजली होती. या वेबसीरिजचे दोन्हीही सीझन चांगलेच हिट ठरले होते. याआधी मनोज बाजपेयी यांनी बँडीट क्वीन, सत्या आणि शूल यासारख्या चित्रपटात काम केले होते. हिंदी आणि मराठीतील या दोन आघाडीच्या अभिनेत्यांनी भोसले या हिंदी चित्रपटात काम केले आहे. मराठी माणूस आणि हिंदी भाषिक यांच्यात झालेल्या वादावर हा चित्रपट आधारित होता.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

“गोव्याला गेलो तरी २० ते २५ हजार खर्च होतात मग…”, संतोष जुवेकरने चाहत्यांना केलं दत्तक पालक होण्याचे आवाहन

मनोज बाजपेयी आणि संतोष जुवेकर यांनी भोसले या चित्रपटात एकत्र काम केले होते. नुकतंच संतोष जुवेकरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नेमकं काय झालं आहे हे अद्याप कळालेले नाही. हे दोघं कुठल्या तरी आगामी सिनेमातील किंवा वेबसीरिजमधील सीनची तयारी करत असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

“माझी आणि मनोज बाजपेयीचं भांडण अक्षरशः हाणामारी पर्यंत आलं आणि पुढे जे घडलं ते सांगतो तुम्हाला. पुरावा म्हणुन हा video post करतोय”, असे कॅप्शन संतोष जुवेकरने दिले आहे. त्याचे हे कॅप्शन पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहे.

“पश्या मला तुला कडकडून मिठी मारायची आहे…”, ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर संतोष जुवेकरची आई भावूक

दरम्यान संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.

Story img Loader