मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. संतोष जुवेकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. पण याच सोशल मीडियामुळे तो अडचणीत सापडला आहे. अभिनेता संतोष जुवेकरचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. त्याने एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

संतोष जुवेकरने मालिका, चित्रपट, नाटक या सर्व प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवली आहे. संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन काही अश्लील फोटो पोस्ट करण्यात येत होते. त्याला याबाबतची माहिती मिळताच त्याने याबाबत रितसर तक्रार केली आहे. तसेच त्याने या पेजला ब्लॉक करण्याचे आवाहनही केले आहे. संतोषने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या फेसबुक अकाऊंटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत यावर भाष्य केले आहे.

“पश्या मला तुला कडकडून मिठी मारायची आहे…”, ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर संतोष जुवेकरची आई भावूक

“मित्रांनो माझं facebook page काही महिन्यांन पूर्वी hack झालं होत. त्यावर फारच अश्लील photo post केले जात आहेत. मी ह्याची रीतसर तक्रार केली आहे cyber crime आणि local police station ला पण अजूनही ही व्हायातगीरी सुरूच आहे. कृपया करून त्या page ला report करून block करा. माझ्या त्या page च्या profile चा screenshot इथे टाकत आहे जेणे करून तुम्हाला ते ओळखण्यास सोप्पे जाईल. तुमच्या ह्या सहकार्यासाठी धन्यवाद”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Video : “हा काय संतोष जुवेकर हाय…”; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याने उडवली अभिनेत्याची खिल्ली

दरम्यान संतोषचा ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.

Story img Loader