मराठी चित्रपट, मालिकांमध्ये अभिनेता संतोष जुवेकरेने उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तो इथवरच थांबला नाही तर त्याने वेबसीरिज, हिंदी चित्रपटांमध्येही काम करण्याचा निर्णय घेतला. संतोष त्याच्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता तो आलिया भट्टचा बहुचर्चित ‘डार्लिंग्ज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याचनिमित्त संतोषने एक पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला.

आणखी वाचा – “दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकींशी जमतं का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं भन्नाट उत्तर

sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
Sridevi
श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी न्यायाधीशांनी तिला कोर्टात…, ज्येष्ठ वकिलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
kajol on indonesian delegants kuch kuch hota hai song
इंडोनेशियन शिष्टमंडळाला ‘कुछ कुछ होता है’ गाण्याची भुरळ, राष्ट्र्रपती भवनात सादर केले शाहरुख-काजोलचे गाणे; अभिनेत्री म्हणाली…
Saif Ali Khan attack
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला नवं वळण; घरात आढळलेले बोटांचे ठसे आरोपीशी जुळत नाहीत
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

आपल्या करिअरच्या सुरुवातीचे दिवस ते ‘डार्लिंग्ज’ पर्यंतचा प्रवास संतोषने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. त्याने सांगितलं की, “वर्ष -१९९८. ठिकाण – दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला प्रॉडक्शन ऑफिस) मी ऑफिसच्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का? कुणाला भेटता येईल का? म्हणून गेटवर जाऊन एका सुरक्षारक्षकाला विचारतो. तर तो मला ओरडून “चल इथून निघ. कोणी बोलावलं तरच इथे यायचं. आता इथून जा” असं म्हणतो. आणि मी त्यावेळी थोडासा नाराज होऊन, थोडासा चिडून त्याला बोलतो “तू थांबच…एक दिवशी तूच माझ्यासाठी हा गेट उघडशील.”

ज्या कंपनीच्या गेटवरूनच निघून जाण्यासाठी संतोषला सांगण्यात आलं आज त्याच कंपनीच्या चित्रपटामध्ये तो अभिनेता म्हणून काम करत आहे. हे संतोषसाठी एक स्वप्नच होतं. शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट कंपनीमधून ‘डार्लिंग्ज’साठी जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा संतोषची प्रतिक्रिया काय होती? त्याचा हा संपूर्ण प्रवास कसा होता हे त्याने सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : “माझा मुलगा चार पावलं…” लेकाची करामत अन् बायकोचा राग, कुशल बद्रिकेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘डार्लिंग्ज’मध्ये संतोष एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच जसमीत के रीनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आलियासह शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. आलियाचा हा चित्रपट येत्या ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader