अभिनेता संतोष जुवेकर प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या अंदाजात दिसत आला आहे. पण हाच संतोष प्रेक्षकांसमोर कोणतीही भीड भाड न ठेवता फक इट म्हणताना दिसणार आहे. पण तो सर्वांसमोर असे शब्द का वापरतो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तरही आमच्याकडे आहे. खरं तर त्याच्या आगामी सिनेमाचे नाव फक इट असे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल सिनेमाला एकदमच ट्रेण्डी आणि हटके नावं देण्याकडे अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांचं लक्ष असतं. सध्याची तरुणाई ज्याप्रकारे कॉलेज कट्यांवरती भाषा वापरते तशीच काहीशी भाषा हल्ली आपल्याला हिंदी मराठी सिनेमांमध्ये वापरलेली दिसते. तसेच सिनेमांची नावेही तरुणाईला पसंत पडतील अशाच पद्धतीची ठेवण्यात येतात. आता युथला पसंत पडतील असे सिनेमे बनवायचे म्हणजे तरुणाईला समजेल अशीच भाषा वापरायला हवी ना?म्हणूनच की काय सध्या वाय झेड, टिटिएमएम, एफयु यांसारखे सिनेमेदेखील मराठीमध्ये पाहायला मिळतात.

अहो एवढेच काय तर आता अशा प्रकारची नावे अगदी बिनधास्तपणे सिनेमांना दिली जात आहेत. संतोषदेखील अशाच एका बॉलिवूड सिनेमामध्ये काम करणार आहे. आश्चर्य फक इट असे नाव असलेल्या या सिनेमात प्रियांका घोष ही अभिनेत्री काम करणार आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन समीत कक्कड यांनी केले आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या सिनेमाच्या सेटवर संतोष एकदमच धमाल मुडमध्ये पाहायला मिळत आहे.

नुकताच संतोषचा या सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या सिनेमाच्या नावावरुन तरी नक्कीच प्रेक्षकांमध्ये सिनेमात काय असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असणार यात काही शंकाच नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor santosh juvekars news movie ascharya fuck it