हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयामुळे घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांना ओळखले जाते. सयाजी शिंदे यांच्यावर मधमांशाचा हल्ला झाला आहे. पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करतेवेळी ही घटना घडली.
सयाजी शिंदे यांनी आतापर्यंत अनेक झाडांचं पुनर्रोपण केले आहे. सध्या पुणे बंगळुरु महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यावेळी त्या ठिकाणी असलेली झाडं वाचवण्यासाठी ते तासवडे या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करतेवेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर सयाजी शिंदे यांना गाडीत बसवण्यात आले. यात सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. ते सुखरुप असल्याची माहिती त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.
आणखी वाचा : “मी ५ लाख घेतले पण…” फसवणुकीच्या आरोपावर अभिनेते सयाजी शिंदेंनी सोडलं मौन
सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहे. एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियाद्वारे प्रत्येकाला वृक्षतोड आणि वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करताना दिसतात. सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे.
आणखी वाचा : Video: मुंबईतील उड्डाणपुलावर बेचकीच्या सहाय्याने बगळ्यांची शिकार, सयाजी शिंदेंनी व्यक्त केला संताप
दरम्यान सयाजी शिंदे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सयाजी शिंदे यांच्याबरोबरच नागराज मंजुळे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे.