प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तिथपासूनच या सीरिजची जोरदार चर्चा रंगू लागली. २९ जुलैपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रूचिता जाधव, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट आहे. सयाजी शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुक अकाऊंटद्वारे ‘मी पुन्हा येईन’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – “तुम्ही खूप कमी बोलता अन्…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
या व्हिडीओमध्ये सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये संवाद साधताना दिसत आहेत. “चला गृहमंत्रीपद तुम्हाला” असं उपेंद्र सयाजी यांना या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. यावर सयाजी म्हणतात, “नाही मला नगरविकास मंत्रीपद पाहिजे.” यावर परत उपेंद्र म्हणतात, “बस का…नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे बंदुकीशिवाय इन्स्पेक्टर वाटेल ना…”
पाहा व्हिडीओ
या दोघांमधील या संवादादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच राजकीय मंडळींसारखेच कपडे या दोघांनी परिधान केले असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सयाजी आणि उपेंद्र यांच्या अभिनयाचं अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – वाघाची डरकाळी, रिक्षाचा हॉर्न अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध काय? दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात…
अरविंद जगताप लिखित या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, चित्रपटात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरीज पूर्ण करेल”