बॉलिवूडच्या किंग खानचा म्हणजेच शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. तो क्वचितच एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. पण सध्या सोशल मीडियावर त्याच्याच नावाचा बोलबाला आहे. अलीकडेच त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इतके सुंदर आहेत की किंग खानलाही त्यावर कमेंट करण्याचा मोह आवरला नाही. त्या फोटोंवरची शाहरुखची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

आणखी वाचा : रजनीकांत यांनी निर्माण केली दहशत, ‘जेलर’ चित्रपटातील लूक आउट

आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये आर्यन त्याची बहीण सुहाना खान आणि लहान भाऊ अबराम खानसोबत दिसत आहे. खान कुटुंबाचे हे फोटो सगळ्यांनाच आवडले आहेत. आर्यन खानने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हॅट-ट्रिक.’ सुपरस्टार शाहरुख खाननेही आर्यनने पोस्ट केलेले फोटो पाहिले आणि त्या पोस्टवर कमेंट केली आहे.

आपल्या मुलांच्या या फोटोंवर कमेंट करताना किंग खानने लिहिले, “माझ्याकडे हे फोटो का नाहीत? ते आता मलाही द्या!” त्याचवेळी त्यावर सुहाना खानने कमेंट करत ‘लव्ह यू’ असे लिहिले. आर्यन खानच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. बऱ्याच काळानंतर आर्यन सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्यामुळे या पोस्टवर चहूबाजूने लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत.

हेही वाचा : करीना कपूर, अर्जुन कपूर होत आहेत ट्रोल, तर शाहरुखचं होतंय कौतुक.. जाणून घ्या कारण

दरम्यान, बहीण सुहानाप्रमाणे आर्यन खानही फिल्मी दुनियेत पाऊल ठेवू शकतो अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Story img Loader