गेली अनेक वर्ष ‘तारक महेता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांना खूपच लोकप्रियता मिळाली. परंतु गेल्या काही महिन्यात काही ना काही कारणाने अनेक कलाकारांनी ‘तारक महेता का उल्टा चष्मा’ मालिका सोडली आहे. नुकतेच तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा हे या मालिकेतून बाहेर पडले. आता यावरून वाद निर्माण होताना दिसत आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाचे टीझर लाँच, कार्यक्रमाची रुपरेषा ठरली

Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Santosh Deshmukh family expresses expectations from Ajit Pawar for justice
“अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा
Dhananjay Munde
“पहाटेची शपथ घेऊ नका असं सांगितलेलं तरी…”, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट

शैलेश यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सोडल्याचं अनेक दिवस उघड केलं नव्हतं. पण त्यांच्या एक्सिटच्या चर्चांना उधाण आल्यानंतर कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी यांनी शैलेश यांनी ही मालिका सोडल्याचं जाहीर केलं. आता तर मालिकेमध्ये तारक मेहताची भूमिका लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफ साकारत आहे. पण शैलेश यांनी ही मालिका अचानक सोडल्यामुळे त्यांच्यात आणि असित यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं समोर आलं आहे.

सध्या शैलेश यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये शैलेश यांनी असित यांचा थेट उल्लेख केला नसला तरी शैलेश यांनी असित यांच्यावरच टीका केली आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. शैलेश यांनी काही दिवसांपूर्वी ‘तुम्ही शेवटचं खरं कधी बोलला होता?’ असा प्रश्न विचारणारी एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट असित यांच्यासाठी होती असे नेटकरी बोलत आहेत. त्यानंतर आता शैलेश यांनी इन्स्टाग्रामवर पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ‘तुम्ही बुद्धीबळातील कितीही मोठे खेळाडू असलात तरी जेव्हा तुम्ही सध्यासरळ व्यक्तीबरोबर वाईट वागता तेव्हा तुम्ही विनाशाच्या मार्गावर जाता,’ असे लिहिले आहे. ही पोस्ट शेअर करत शैलेश यांनी लिहिलं आहे की, ‘आज नाही तर उद्या…देव सगळं काही बघत आहे.’ शैलेश यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत ही पोस्ट असित मोदी यांच्यावर आहे का? असा प्रश्न शैलेश यांना विचारला आहे.

आणखी वाचा : “कोणताही कलाकार मालिका सोडतो तेव्हा मला.. ” तारक मेहताचे निर्माते भावूक

अनेक वर्षांपासून शैलेश ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांनी मालिकेला अलविदा केला आहे. शैलेश यांनी काँट्रॅक्ट संपत असल्यानं मालिका सोडल्याचं कारण दिलं आहे. परंतु ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या करारानुसार एकाचवेळी ते दुसऱ्या कार्यक्रमाात काम करू शकणार नव्हते. त्यामुळेच त्यांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले जात आहे.

Story img Loader