मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांवर ठसा उमटवणारे अभिनेते म्हणून शरद पोंक्षेंना ओळखले जाते. ते कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. शरद पोंक्षे यांना कट्टर सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. ते कायम त्यांचे विचार सोशल मीडियाद्वारे मांडताना दिसतात. अनेकदा यामुळे त्यांना टीका सहन करावी लागते. यावरच त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शरद पोंक्षे हे विविध कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल व्याख्यानं देत असतात. नुकताच त्यांनी अंदमान येथील सेल्युलर कारागृहाच्या बाहेरील बागेतला फोटो शेअर केला आहे. ज्यात ते पर्यटकांना सावरकरांबद्दल माहिती देत आहे असे दिसत आहे. त्यांनी कॅप्शन दिला आहे की “आज सेल्युलर जेलच्या बाहेर सावरकर बागेत सावरकर सांगताना (टीका करणाऱ्यांनी टीका करा, आम्ही सावरकर पोहचवतो)” असा कॅप्शन दिला आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजा छत्रसाल यांच्या मैत्रीबद्दले एका व्हिडीओत सांगितलं होतं. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांचं वचन पूर्ण करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी राजा छत्रसाल यांची कशा पद्धतीने मदत केली होती, याबद्दलही सांगितलं होतं. मात्र, त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं.