गेल्या काही दिवसांपासून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांची हिंदी सिनेसृष्टीत क्रेझ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक दाक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषेमध्ये डब करून काही वाहिन्यांवर दाखविले जातात. आपला प्रेक्षकवर्ग देखील आवडीने साऊथ डब चित्रपट पाहतात. ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ २’ या दाक्षिणात्य डब चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ २’ या हिंदी डब केलेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतंच अभिनेता श्रेयस तळपदे याने केजीएफ २ च्या हिंदी डबिंगवर एक वक्तव्य केले आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा’या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनं आवाज दिला आहे. त्याच्या या आवाजाचे अनेकांनी कौतुकही केले होते. नुकतंच श्रेयस तळपदेला केजीएफ २ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज का दिला नाहीस? असा प्रश्न एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “ज्याने या चित्रपटासाठी डबिंग केले असेल ते नक्कीच अप्रतिम असेल.”

“हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही, त्यामुळेच…”, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने बॉलिवूडबद्दल मांडलं स्पष्ट मत

“मी अजून केजीएफ २ हा चित्रपट पाहिलेला नाही. पण मला खात्री आहे की ज्या कलाकाराने या चित्रपटाचे डबिंग केले असेल त्यांनी नक्कीच जबरदस्त काम केले असेल”, असेही त्याने पुढे म्हटले. श्रेयस तळपदेचे हे उत्तर ऐकल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

घटस्फोटानंतर केलेल्या बोल्ड फोटोशूटवर समांथाचा मोठा खुलासा, म्हणाली “एकेकाळी…”

KGF आणि KGF 2 च्या यशानंतर आता चाहते KGF च्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. ट्विटर असो वा इन्स्टाग्राम, चाहत्यांमध्ये केजीफी चॅप्टर ३ बद्दल उत्साह पाहायला मिळत आहे. चॅप्टर २ मध्ये दाखवण्यात आलेला सस्पेन्सचा उलगडा चॅप्टर ३ मध्ये होईल असे प्रेक्षकांना वाटते. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन देखील मुख्य भूमिका साकारत आहेत.

Story img Loader