अभिनेता श्रेयस तळपदे हा लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आपडी थापडी असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच हा चित्रपट मनोरंजक असल्याचं कळत आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रटाचा सहकुटुंब आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी यांच्यातील एका पैशासंबंधी संवादाने होते. अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग आणि त्यानंतर उडणारी धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
SHIVA
Video : “तू कुठल्या अधिकाराने…”, शिवा-आशूमध्ये होणार पुन्हा भांडण; सिताई देणार नातं संपवण्याचा सल्ला, पाहा प्रोमो….
a young guy Caught Sleeping in Theater
चित्रपट संपला, लोक घरी परत जात होते, पण तरुण मात्र गाढ झोपलेला; थिएटरमधील VIDEO होतोय व्हायरल
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “ही सीसीटीव्हीच…”, सूर्या निर्दोष असल्याचा पुरावा तुळजाला मिळणार का? ‘लाखात एक आमचा दादा’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
man murders mother and sisters
Video: “त्यांनी माझ्या बहिणींना विकले असते…”, चार बहिणी, आईची हत्या करणाऱ्या अर्शदचा धक्कादायक व्हिडीओ समोर
Puneet Khurana suicide case delhi
Video: “तू फट्टू आहेस…”, पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; अतुल सुभाष प्रकरणासारखा व्हिडीओ रेकॉर्ड केला

अवघ्या काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला १० हजारांहून अधिक व्ह्यूज आल्याचे पाहायला मिळत आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे हे कलाकार पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : “रेखाजींनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या…” विशाखा सुभेदारने सांगितला ‘तो’ अनुभव

आपडी थापडी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती के सायलेंटच्या केसी पांडे यांनी केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांनी केले आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे, अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली जाणार आहे.

यात सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, दमदार कथा आणि तांत्रिकदृष्ट्याही परिपूर्ण असलेला हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader