बऱ्याच काळापासून दाक्षिणात्य चित्रपट हिंदी भाषेमध्ये डब करून काही वाहिन्यांवर दाखविले जातात. आज आपला प्रेक्षकवर्ग देखील आवडीने साऊथ डब चित्रपट पाहतात. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ २’ या साऊथ डब चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटांसमोर हिंदी चित्रपटही फिके पडले. पण यामुळे बॉलिवूडकर घाबरले असा याचा अर्थ होत नाही. हिंदी चित्रपट देखील साऊथमध्ये डब करून प्रदर्शित केले जाऊ शकतात असं अभिनेता श्रेयस तळपदेचं म्हणणं आहे.
नुकतंच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयस हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांबाबत भरभरून बोलत होता. साऊथचे हिंदी डब चित्रपट आज बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहेत. आपणही आपले हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करून प्रदर्शित करू शकतो असं श्रेयसचं म्हणणं आहे.
आणखी वाचा – “हिंदी चित्रपट साऊथमध्ये डब करा अन्…” प्रसिद्ध दिग्दर्शकाने अक्षय-अजयला दिलं आव्हान
काय म्हणाला श्रेयस तळपदे?
बॉलिवूडला आता साऊथची त्सुनामी येणार आहे, बॉलिवूड घाबरलं आहे वगैरे वगैरे काहीजणं असं म्हणत आहेत. पण मला असं वाटत नाही कोणी असं घाबरलं आहे आणि घाबरायची गरज देखील नाही. फक्त हिंदी चित्रपटच नाही तर सर्वभाषिक चित्रपटांच्या प्रगतीसाठी हा उत्तम वेळ आहे. मराठी, हिंदी, किंवा गुजराती चित्रपट असो तुम्ही तुमचे चित्रपट इतर भाषांमध्ये डब नक्कीच करू शकता. इतर भाषांमध्ये चित्रपट डब करून प्रदर्शित करा तुम्हाला कोणी थांबवलं आहे. तुमचा कंटेंट जर पावरफुल असेल तर साऊथचे प्रेक्षकही तुमचा चित्रपट बघणारच. तसा प्रेक्षकवर्ग तिकडेही आहे. त्यांचे चित्रपट जसे आपण बघतो तसं आपले चित्रपट ते का नाही बघणार? तुमच्या मनाचा हा सगळा खेळ आहे. आपले साऊथमध्ये डब केलेले १० चित्रपट तिथे चालणार नाहीत पण ११वा चित्रपट तरी चालेल. यामधूनच साऊथमध्ये आपलं स्थान वाढेल आणि या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे.” असं स्पष्टपणे श्रेयसने चित्रपटांविषयी आपलं मत व्यक्त केलं.
आणखी वाचा – ही तर हद्दच झाली, गॅसवर गरम करून उर्फीने तयार केला टॉप, फोटो VIRAL
पुढे बोलताना तो म्हणाला, “साऊथचे कित्येक डब चित्रपट आपल्या वाहिन्यांवर दाखवले जातात. आपला प्रेक्षक वर्ग हा चित्रपट आवडीने पाहतो. यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला. माझी आई स्वतः दाक्षिणात्य चित्रपटांची खूप मोठी फॅन आहे. तिला जेव्हा कळालं मी ‘पुष्पा’ चित्रपटासाठी डबिंग करणार आहे ती तेव्हा फार खूश झाली. अल्लु अर्जूनसाठी मी डबिंग करणार म्हटल्यावर तिला आनंद झाला होता. मराठी, हिंदी, किंवा गुजराती चित्रपट असो तुम्ही तुमचे चित्रपट इतर भाषांमध्ये डब नक्कीच करू शकता.”
दाक्षिणात्य चित्रपटांचं क्रेझ आजच्या प्रेक्षकवर्गामध्ये जरी वाढलं असलं तरी चांगल्या हिंदी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत नाहीत. उत्तम कलाकृती अनुभवायला मिळाली की थिएटर फुल आणि बॉक्सऑफिसवर चित्रपटांची बक्कळ कमाई होत राहणार एवढं नक्की.