मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी निर्माण करणारा अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला ओळखले जाते. श्रेयस तळपदे नुकताच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसला होता. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. श्रेयस कामाच्याबरोबरीने त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. नुकताच त्याने त्याच्या लग्नाबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीदेखील आज पडद्यामागे राहून श्रेयसला साथ देत असते. या दोघांची ओळख एक कॉलेजमधील एका कार्यक्रमात झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि भेटींचे प्रेमात रूपांतर झाले अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या लग्नादरम्यान श्रेयसला त्याचा पहिलावहिला हिंदी चित्रपट मिळाला. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘इक्बाल’, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार होते आणि त्यादरम्यान श्रेयसचे लग्न होणार होते.
‘भीड’ चित्रपटाला वादाचा फटका; प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख
जेव्हा दिग्दर्शकाने श्रेयसला सांगितले की तुला आता हैदराबाद येथे ट्रेनिंगसाठी जावं लागणार आहे. श्रेयसने दिग्दर्शकाला सांगितले की “माझे लग्न त्यादरम्यान आहे. कृपया मला एक दिवस त्यासाठी द्या.” तेव्हा त्याची विनंती दिग्दर्शकाने मान्य केली नाही उलट त्याला सल्ला दिला की “तू लग्न पुढे ढकल, नाहीतर मला दुसरा विचार करावा लागेल” मात्र श्रेयसकडे बघून अखेर त्यांनी माघार घेतली आणि त्याला लग्नासाठी एक दिवस सुट्टी दिली. श्रेयसने चित्रीकरणामधून वेळ काढत मुंबई गाठली लग्न केले आणि पुन्हा दुसऱ्याच दिवशी हैदराबाकडे प्रस्थान केले. श्रेयसने हा किस्सा ‘बॉंबे जर्नी’ या कार्यक्रमात सांगितला आहे.
श्रेयसने ‘इक्बाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले होते. प्रसिद्ध निर्माते सुभाष घई यांनी चित्रपटाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. या चित्रपटात नसरुद्दिन शाह , यतीन कार्येकर, दिवंगत अभिनेते गिरीश कर्नाड यांसारखे दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता.