हिंदी चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या दृष्टीने सध्याचा काळ थोडा कठीण आहे. ओटीटीचे प्रस्थ वाढले आहे. चित्रपट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटगृह आणि ओटीटी दोन्ही माध्यमे उपलब्ध आहेत. मात्र चित्रपट हे मुळातच चित्रपटगृहात जाऊन अनुभवण्याचे माध्यम आहे. त्यामुळे सध्या चित्रपटगृहात आपला चित्रपट प्रदर्शित होतो आहे हेच कलाकारांसाठी यशाचे नवे समीकरण आहे, असा विचार अभिनेता श्रेयस तळपदे याने ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडला.

मराठी नाटक ते हिंदी चित्रपटांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून कलाकार म्हणून स्वत:ला सिद्ध केलेला अभिनेता श्रेयस तळपदे आबालवृद्धमध्ये लोकप्रिय आहे. मधल्या काळातील एका कठीण प्रसंगाचा धैर्याने सामना केल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आला आहे. या वर्षाची सुरुवात त्याने महेश मांजरेकर यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून केली होती. आता तो ‘करतम भुगतम’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोहम पी. शाह दिग्दर्शित ‘करतम भुगतम’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा याबद्दल एका घटनेच्या माध्यमातून परखड भाष्य करणारा हा थरारपट आहे.

Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

हेही वाचा >>> जान्हवी कपूरला ‘असा’ हवाय जोडीदार, अपेक्षा सांगत म्हणाली, “जेव्हा मी…”

या चित्रपटाबद्दल बोलताना, सध्याच्या काळात समाजमाध्यमांवर जोतिषशास्त्र आणि राशीभविष्य याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तरुणांमध्ये वाढते आहे, याकडे श्रेयसने लक्ष वेधले. ‘कोविडकाळानंतर लोक भविष्याबद्दल उत्सुकता म्हणून ज्योतिषशास्त्राचा किंवा राशीभविष्याचा अधिक आधार घेताना दिसत आहेत. आगामी काळ आपल्यासाठी कसा असेल? काय घटना आपल्या आयुष्यात घडणार आहेत किंवा आलेला वाईट काळ कसा दूर करता येईल? यांसारख्या अनेक प्रश्नांचे निरसन करण्यासाठी लोक ज्योतिषाचा आधार घेतात. याच पार्श्वभूमीवर हा चित्रपट आधारित आहे. न्यूझीलंडवरून १० दिवसांच्या कामासाठी भोपाळला आलेल्या देव जोशी या तरुणाला एका ज्योतिषी भेटतो आणि तो त्याला तू परत परदेशात जाऊ शकणार नाहीस असे सांगतो. ज्योतिषाचे म्हणणे डोक्यात घेऊन वावरणाऱ्या देवला खरोखरच परदेशात परतायची संधी मिळते की नाही? की भलतेच काही त्याच्या आयुष्यात घडते याचे चित्रण करत अंधश्रध्देला बळी पडणाऱ्या तरुणांची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे’ असं श्रेयसने सांगितलं.

या चित्रपटासाठी त्याचा विचार कसा झाला? याचा किस्सा सांगताना दिग्दर्शक सोहम शहा याच्याशी आधीपासूनच चांगली ओळख होती, मात्र काम करण्याचा योग जुळून येत नव्हता, असं त्याने सांगितलं. ‘सोहमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर असा प्रसंग घडला होता, त्यामुळे त्याच्या डोक्यात गेली काही वर्षं ही कथा घोळत होती. त्याने माझा ‘कौन प्रवीण तांबे?’ हा चित्रपट पाहिला होता. त्यामुळे त्याने या चित्रपटासाठी माझी निवड करण्याचे ठरवले होते. मलादेखील अनेक वर्षांपासून त्याच्याबरोबर काम करायचे होते. त्याने मला ‘लक’ या चित्रपटासाठीदेखील विचारले होते, पण त्यावेळी मला त्या चित्रपटात काम करणे शक्य नाही झाले. मात्र सोहमने कधी याचा राग मनात ठेवला नाही. त्यानंतर आमची खूप चांगली मैत्री झाली. सोहम हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याला आजवर अपेक्षित अशी प्रसिद्धी मिळाली नव्हती, ती या चित्रपटाच्या निमित्ताने मिळेल’ अशी आशाही श्रेयसने व्यक्त केली.

हेही वाचा >>> घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत मामा-मामींना गमावलं, कार्तिक आर्यनने अंत्यसंस्काराला लावली हजेरी, फोटो व्हायरल

या चित्रपटात श्रेयसने विजय राज आणि मधू शहा यांच्यासारख्या उत्तम कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्याबद्दल बोलताना विजय राज यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले, असे त्याने सांगितले. आम्ही दोघंही मुळात विनोदी कलाकार आहोत. या चित्रपटात आम्ही गंभीर भूमिका केली आहे. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर असतानाचे विजय राज आणि कॅमेऱ्यामागे असलेला त्यांचा वावर दोन्ही अप्रतिम अनुभव होता. दृश्य चित्रित व्हायच्या आधी सेटवर गमतीजमती करणारा हा माणूस कॅमेरा सुरू होताच परकाया प्रवेश केल्याप्रमाणे त्या पात्राशी एकरूप व्हायचा. त्यांच्या अभिनयातील ही सहजता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, असे त्याने स्पष्ट केले. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अभिनेत्री मधू शहाबरोबर काम करता आले याबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला.

‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटानंतर लगेचच ‘करतम भुगतम’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला. ‘डिसेंबर महिना हा माझ्यासाठी फारच अवघड होता. एकूणच वातावरण गंभीर झाले होते. अशावेळी ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यावेळी प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे मला नव्याने बळ मिळाले. ज्यासाठी मी एवढी वर्षं काम करतोय ते प्रेक्षकांचे प्रेम मला मिळाले’ असे श्रेयस आनंदाने सांगतो. ‘त्यानंतर ‘करतम भुगतम’ या दुसऱ्या चित्रपटाची तयारी सुरू झाली. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला, जागोजागी होर्डिंग्ज लागली, चर्चा सुरू झाली, ट्रेलरला पसंती मिळते आहे हे लक्षात आले… या सगळ्याच खूप आनंद देणाऱ्या गोष्टी होत्या.

 ‘नवनव्या धाटणीचे चित्रपट करतो आहे

चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठीच केला जातो. एखादा चित्रपट चालणे वा न चालणे हे अंदाज, यशाची समीकरणे सगळे चित्रपटांची निर्मिती झाली तेव्हापासून अव्याहत चालत आलं आहे. आजपावेतो शेकडोंच्या संख्येने चित्रपट तयार झाले, त्यातले सगळेच चित्रपट चालले असे नाही आणि भविष्यातदेखील हे असेच सुरू राहणार आहे. पण, चित्रपटगृहात जाऊन उत्तम चित्रपट पाहणे हा अनुभव प्रत्येक प्रेक्षकाला घ्यायचा असतो, प्रेक्षकांची आवड इथे महत्त्वाची ठरते. त्यांना आपले पैसे वाया गेले नाहीत असे वाटले म्हणजे त्यांची दाद मिळाली. चित्रपट हिट झाला, या मताचा मी आहे, असे सांगणारा श्रेयस यावर्षी वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून काम करत असल्याचेही सांगतो. ‘कर्तम भुगतम’ पाठोपाठ ‘अजागृत’, ‘कपकपी’, ‘इमर्जन्सी’, ‘वेलकम टू जंगल’ आणि ‘पुष्पा २’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सर्व आगामी चित्रपटांमधून मी स्वत:ला नव्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही त्याने सांगितले.

कलाकाराची कामाची भूक धगधगती हवी

कलाकाराची कामाची भूक, त्यासाठीची त्याची धडपड ही एखाद्या तप्त अग्नीप्रमाणे धगधगती असली पाहिजे. तुमच्या एकांकिकेला खूप प्रेम मिळाले. ती एकांकिका प्रसिद्ध झाली म्हणजे तुम्हला सगळे काही आले हा भ्रम मनाला शिवता कामा नये. कारण प्रत्येक पात्र वेगळे, कथा वेगळी, माध्यम वेगळे… त्यानुसार त्यावर घ्यावी लागणारी मेहनतही वेगळी असते. त्यामुळे नम्र राहा, विनयशील राहा आणि सतत शिकण्याचा प्रयत्न करत राहा, असे श्रेयस नव्याने अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना सांगतो.

सध्याच्या ओटीटीच्या काळात चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्याचेच दडपण अधिक वाटते. तिथे चित्रपट प्रदर्शित होणार हेच माझ्यासाठी चित्रपट हिट होण्यासारखे आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत निर्मात्याला त्याच्या चित्रपटाबद्दल विश्वास वाटत असेल तरच तो चित्रपटगृहातून चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस करतो. श्रेयस तळपदे

Story img Loader