आपल्या अभिनयातील विविधतेसाठी प्रसिद्ध असलेला सिध्दार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीतील बहुरंगी असा अभिनेता. सिद्धार्थने अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा त्याच्या सहज अभिनय शैलीच्या जोरावर लिलया पार पाडल्या. आत्तापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिका पाहिल्या तर लक्षात येईल की पठडीतला ठराविक बाजाचा अभिनय न करता, त्याने सतत नाविन्यपूर्ण अशा व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘पॉपकॉर्न’ या त्याच्या आगामी चित्रपटात तो स्त्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिद्धार्थला स्त्रीच्या भूमिकेत पाहणे खचीतच करमणुकीचे ठरणार आहे. चित्रपटातील काही दृश्ये साकारताना सिद्धार्थने स्त्रीचा वेष परिधान करणे गरजेचे होते. गजेंद्र आहिरे यांच्या या चित्रपटात सई ताम्हणकर, मनवा नाईक, आदिती भागवत आणि स्मिता तांबे या अभिनेत्री ग्लॅमरर्स अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. याशिवाय मुक्ता बर्वेचा देखील बोल्ड अवतार पाहायला मिळणार आहे. गोव्याच्या सुंदर समुद्र किनारी शुटींग करण्यात आलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा