दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये एका हॅलोवीन पार्टीदरम्यान धक्कादायक घटना घडली. या पार्टीदरम्यान चेंगराचेंगरीत १०० हून अधिक लोक जखमी झाले. आता या संदर्भातच एक दुःखद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध गायक आणि अभिनेता ली जी-हान (Lee Ji-Han) याचं या हॅलोवीन पार्टीदरम्यान निधन झालं आहे. या हॅलोवीन पार्टीला प्रचंड गर्दी होती. याच गर्दीमध्ये ली जी-हान अडकला.
कोरियन मीडियाच्या वृत्तानुसार, हॅलोवीन पार्टीदरम्यान जमलेल्या गर्दीमध्ये ली जी-हानला श्वास घेणं कठीण झालं. यादरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यु झाला आहे. खास मित्र-मंडळींबरोबर ली जी-हान या हॅलोवीन पार्टीमध्ये सहभागी झाला होता.
ली जी-हानच्या निधनानंतर कोरियन कलाविश्वातील मंडळींना दुःखद धक्का बसला आहे. कोरियन गायन स्पर्धा ‘प्रोड्यूस १०१’च्या दुसऱ्या सीझनमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. शिवाय त्याने कोरियन नाटकांमध्येही अभिनेता म्हणून काम केलं आहे. त्याचं वय अवघं २४ वर्ष होतं.
आणखी वाचा – ‘हॅलोविन’ दुर्घटनेतील मृतांची संख्या १५१
दक्षिण कोरियातील या धक्कादायक घटनेचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या हॅलोवीन पार्टीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १०० हून अधिक लोक जखमी झाले. तसेच यामधील ५० जणांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय १०० पेक्षा अधिक लोकांना या पार्टीमध्ये आपला जीव गमवावा लागला.