प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सूरज थापरची पत्नी दिप्ती ध्यानीने प्रेमाचा एक अनोखा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. दीप्ती ध्यानीने आपल्या पतीच्या फायद्यासाठी तिरुपती बालाजीला आपले केस दान केले आहेत. यानंतर सूरजने दीप्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सेलिब्रिटी ते नेटकऱ्यांनी सगळ्यांनी यावर कमेंट करत दीप्तीचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरजने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला दीप्तीने जुडा घातल्याचे दिसत आहे, तर नंतर तिने मुंडण केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘ट्रान्सफॉर्मेशन… या जगात तुमच्यासाठी असं कोण करत नाही…हे खरं प्रेम आहे’, असे कॅप्शन सुरजने दिले. सुरजने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : जेव्हा माधुरी, सलमान आणि शाहरुख एकत्र येतात…, फोटो व्हायरल

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

गेल्या वर्षी मे महिन्यात सूरजला करोना झाला होता. सूरजची प्रकृती इतकी बिघडली होती की त्याच्या फुफ्फुस्यांचं ७०% पर्यंत नुकसान झाले होते आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. सूरजच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दीप्तीने नवरा पूर्ण बरा झाला तर तिचे केस तिरुपती बालाजीला दान करीन असा नवस केला होता. आता सूरज पूर्णपणे बरा झाल्यानंतर दीप्तीने मुंडण केले आहे.

आणखी वाचा : पत्नी ताहिरा कश्यपने सेक्स लाइफवर लिहिलेल्या पुस्तकाबाबत आयुषमान खुरानाने केले वक्तव्य, म्हणाला…

आणखी वाचा : ऐश्वर्याला खोटी अंगठी देत अभिषेकने केले होते प्रपोज, अभिनेत्याने सांगितले होते या मागचे कारण

दरम्यान, सुरजच्या कामा विषयी सांगायचे झाले तर, तो चंद्रगुप्त मौर्य, रझिया सुलतान, एक नई पेहचान, ससुराल गेंदा फूल, भाई भैय्या और ब्रदर, अकबर का बाल बिरबल, तेनाली राम यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दिसला आहे.