नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे हे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सुबोध भावे यांनी नागराज मंजुळेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुबोध भावे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सुबोध भावे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी नागराज मंजुळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सुबोध भावेंनी झुंड चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.

“नागराज तुझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा उद्या तू गाठतोयस, आमच्या पिढीचा तू एक महत्त्वाचा दिग्दर्शक आहेस आणि तुझ्या प्रत्येक चित्रपटाची उत्सुकता नेहमीच असते. ४ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या “झुंड” या तुझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा”, असे कॅप्शन सुबोध भावेंनी दिले आहे.

त्यासोबत सुबोध भावेंनी टाळ्या वाजवतानाचा इमोजीही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नागराज मंजुळेंना टॅगही केले आहे. दरम्यान त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

“तुझा आजचा दिवस अन्…”, ‘आई कुठे काय करते’मधील संजनाने अरुंधतीसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट आज ४ मार्चपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor subodh bhave share emotional post for nagraj manjule jhund movie nrp