सुबोध भावे, अभिनेता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्याचे दुसरे नाव आनंद आहे. माणसाने या आनंदी आयुष्यात ताण नावाच्या राक्षसाला कधीच आणू नये. मी या ताण नावाच्या निर्थक गोष्टीला माझ्या जीवनात कधीच जवळ करत नाही. कामाच्या निमित्ताने अनेकदा व्यस्त असतो. चित्रीकरणामुळे अनेकदा लांब प्रवास करावा लागतो. या दूरच्या प्रवासामुळे कधी कधी मानसिक थकवा येतो. पण जास्त थकलो तरी हा सगळा ताण दूर करण्यासाठी नेहमीच्या कामापेक्षा वेगळे काहीतरी करून मी माझे मन रमवण्याचा प्रयत्न करतो. संगीत ऐकतो. कुठे प्रवास करत असेल किंवा मोकळा वेळ असल्यास मी संगीत ऐकण्यास जास्त प्राधान्य देतो. खासकरून मी शास्त्रीय संगीत ऐकतो. संगीतात एक वेगळीच ताकद आहे. एक अशी ताकद, जी तुमच्या थकलेल्या मनालासुद्धा पुन्हा ताजेतवाने करून एक नवीन ऊर्जा उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरते. कधी कधी थकवा दूर करण्यासाठी मी पुस्तकांचा आधार घेतो. प्रामुख्याने काल्पनिक पुस्तके वाचायला मला आवडतात. वाचनातून एक नवा विचार वाढीस लागून पूर्ण थकव्याला दूर करतो. मी व्यायाम करतो. व्यायामात मला चालायला, धावायला आवडते. यामुळे दोन फायदे होतात. एक म्हणजे शारीरिक ताण दूर होतो आणि दुसरा म्हणजे मन खूप ताजे राहते. चित्रीकरणाच्या ठिकाणी अनेकदा काही तांत्रिक किंवा नैसर्गिक कारणांमुळे चित्रीकरण लांबते. त्यामुळे बसून राहावे लागते. अशा वेळी थकवा किंवा चिडचिड होण्याची शक्यता असते. अशा वेळी मी सेटवरील इतर सहकलाकारांशी गप्पा करतो. त्यामुळे वेळही जातो आणि संवादामुळे नवीन विषय मिळतात. मानसिक थकवा जाणवत नाही.

शब्दांकन:  हृषीकेश मुळे