मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. आज सुबोध भावेच्या लग्नाचा २१ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने त्याच्या बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या बायकोसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्याने त्याच्या पत्नीला खास शुभेच्छाही दिल्या आहेत.

“मस्तानीनंतर झोप…” सुबोध भावेच्या पोस्टपेक्षा कलाकारांच्या कमेंट्सचीच चर्चा

“लग्नाच्या २१ व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मंज्या”, अशा शब्दात सुबोधने त्याची पत्नी मंजिरीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता स्वप्निल जोशी याने या पोस्टवर कमेंट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो! तुमचे प्रेम असेच कायम राहो! असे म्हटले आहे.

“ही आनंदाची बातमी शेअर करताना अतिशय अभिमान वाटतोय…”, सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान अभिनेता सुबोध भावेने बालमैत्रीण मंजिरी हिच्याशी लग्न केलं. २००१ मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. मात्र दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. सुबोध आणि मंजिरी ३० वर्षांपासून सोबत आहेत. या दोघांना मल्हार आणि कान्हा ही दोन मुलं आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor subodh bhave wedding anniversary special wish to wife manjiri bhave nrp