प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांना श्वसनमार्गातील संसर्गामुळे त्रास सुरू झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बेली व्हय़ू रुग्णालयाच्या निवेदनानुसार सुचित्रा सेन यांचा श्वासोच्छ्वास आता सुधारला असून त्यांनी सकाळी अन्न घेतले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना पूर्णपणे वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले आहे. डॉक्टरांच्या मते त्यांच्या श्वसनमार्गातील जंतुसंसर्ग आटोक्यात असून, त्यांना प्रतिजैविक औषधे देण्यात आली आहेत. डॉक्टरांनी त्यांना अगोदर हृदयविकार विभागात दाखल केले होते. हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सुब्रता मोईत्रा यांच्यासह पाच डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सुचित्रा सेन यांनी कुटुंबीयांशिवाय इतर कुणालाही भेटण्यास नकार दिला आहे.
सुचित्रा सेन यांनी ‘शेष कोथाय’ या चित्रपटातून १९५२ मध्ये पदार्पण केले. नंतर बिमल रॉय यांच्या १९५५मधील ‘देवदास’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘आँधी’ या राजकीय नाटय़ावर आधारित चित्रपटात त्यांनी संजीवकुमार यांच्यासमेवत भूमिका केली होती.
सुचित्रा सेन यांची प्रकृती स्थिर
प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांना श्वसनमार्गातील संसर्गामुळे त्रास सुरू झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
First published on: 31-12-2013 at 12:41 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor suchitra sen in stable condition