अभिनेता सनी देओल (Sunny Deol) बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. वयाच्या ६५व्या वर्षी देखील तो तितकाच मेहनतीने काम करताना दिसतो. चित्रपटांमधील आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी सनी हवी ती मेहनत घ्यायला तयार असतो. त्याची मेहनत चित्रपटांमध्ये दिसून येतेच. बऱ्याच कलाकारांना चित्रीकरणादरम्यान दुखापत होते. सनीचं देखील आता असंच काहीसं झालं आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सनीला दुखापत झाली आहे.
आणखी वाचा – रणबीर कपूरची जादू फिकी, अवाढव्य खर्च, जबरदस्त प्रमोशन करूनही ‘शमशेरा’ला थंड प्रतिसाद
काही आठवड्यांपूर्वी आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना सनीला दुखाप झाली. पण ही दुखापत त्याला महागात पडली आहे. याच्या उपचारासाठी सनी अमेरिकेला रवाना झाला आहे. सनीच्या पाठीला दुखापत झाल्यानंतर मुंबईमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. दुखापत झाल्यामुळे सनी भारतीय राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकला नाही.
सनी पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभा खासदार आहे. तो राष्ट्रपती निवडणुकीला उपस्थित नसल्याने त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण आता याचं खरं कारण समोर आलं आहे. मुंबईमध्ये उपचार घेतल्यानंतर तो आता अमेरिकेमध्ये उपचार घेत आहे. याबद्दल सनीच्या एका जवळच्या व्यक्तीने माहिती दिली.
आणखी वाचा – Video : पुणे विमानतळावर ‘पावनखिंड’ चित्रपट सुरु होता अन्…; प्रत्यक्ष बाजीप्रभु देशपांडेंचं घडलं दर्शन
तो म्हणाला, “चित्रीकरणादरम्यान सनीला दुखापत झाली. दोन आठवड्यांपूर्वीच पाठीला झालेल्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो अमेरिकेला गेला आहे. भारतीय राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान तो इथे नव्हता. उपचार पूर्ण झाल्यानंतर तो भारतात परतणार आहे.” सनीचे सध्या ‘बाप’, ‘सूर्या’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.