बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता तुषार कपूरने चित्रपटसृष्टीत २० वर्षे पूर्ण केली आहेत. याच दरम्यान, एका मुलाखतीत तुषारने करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगितले आहे. चित्रपटसृष्टीत येणाऱ्या नवीन व्यक्तीला कोणते सल्ले दिले जात होते या बद्दल त्याने सांगितले आहे. तुषारने २००१ मध्ये बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानसोबत ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला तुषारने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तुषारने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याला कोणते सल्ले दिले ते सांगितलं आहे. “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी खूप शांत होतो. गप्प बसायचो तेव्हा लोक मला विचित्र सल्ला द्यायचे. पार्ट्यांमध्ये भांडण करत जा, कोणत्याही प्रकरणात शाहरुख सारखं कर आणि अजून खूप काही सांगायचे. हे सगळं मजेशीर होतं पण भितीदायक सुद्धा कारण मी चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या एका कुटुंबातून आलो आहे आणि त्यात हे सगळं मला सांगितलं गेलं. ही विचार करण्याची गोष्ट आहे जे लोक चित्रपटसृष्टीचा भाग नाही त्या आऊटसाइडर्स लोकांना कोणत्या प्रकारच्या गोष्टींतून जावं लागेल याची कल्पना करा,” असे तुषार म्हणाला.
View this post on Instagram
तुषार पुढे म्हणाला, “आता काळ बदलला आहे, पण त्या काळात बरीचशी माणसे होती, जे गरज नसताना अनेक गोष्टी सांगत फिरायचे. असे लोक आपल्याला प्रोडक्शन हाऊस आणि सेटवर आरामात भेटतील. त्यानंतर आपण लगेच, आपण केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करायला सुरुवात करतो. मग, हळूहळू मला कळलं की जर चित्रपट चांगला असेल आणि तुम्ही खूप मेहनत घेतली असेल तर कोणीही काही करू शकत नाही.”
आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा
तुषार आता अभिनेत्यासोबत निर्माता देखील झाला आहे. त्याने गेल्या वर्षी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. अभिनयापेक्षा चित्रपटाची निर्मिती करणे खूपच कठीण आहे, पण त्याला ते आवडतं, असं तुषार म्हणाला.
आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?
तुषारचं कुटुंब हे चित्रपटसृष्टीत सक्रिय असलं तरी त्याने कधी विचार केला नव्हता की तो एक अभिनेता होईल. जेव्हा तो अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करुन इथे आला तेव्हा त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्याने दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत सहायक्क दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
दरम्यान, ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तुषार म्हणाला की, जेव्हा मला ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटासाठी विचारण्यात आले तेव्हा मला माहित नव्हते की मी अभिनेता होऊ शकतो की नाही. पण मी लगेच होकार दिला. अभिनय क्षेत्रात येण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मला माझं काही काम करायचं होतं आणि म्हणून मी परदेशात अभ्यासासाठी गेले.”