बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विद्युत हा अ‍ॅक्शन हीरो म्हणून ओळखला जातो. विद्युत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अभिनेता तो उत्तम आहेच, त्याचबरोबर एक माणूस म्हणूनही तो खूप चांगला असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्याच्या कृतीने आणि विचारांनी नेहमी सर्वांना तो आकर्षित करत असतो. आता पुन्हा एकदा त्याच्या विचारांनी सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वळवले आहे. मला मूल हवे असेल तर मी दत्तक घेईन, आयव्हीएफ किंवा सरोगसीचा मार्ग स्वीकारेन, असे तो म्हणाला आहे.

हेही वाचा : ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’चा ट्रेलर प्रदर्शित, सनी देओलचा दमदार अंदाज पाहिलात का?

नुकतीच त्याने पितृत्वाबद्दलची त्याची मतं मांडली. तो म्हणाला, “मूल होण्यासाठी दत्तक, सरोगसी आणि आयव्हीएफसारख्या पद्धती स्वीकारायला मी तयार आहे. मी मूल दत्तक घेऊ शकतो, मी आयव्हीएफ करू शकतो किंवा सरोगसी करू शकतो… मी सर्व पर्यायांसाठी मी खुला आहे. मूल हे मूल असते. त्याबद्दल वेगळा विचार करण्याची पद्धत नसावी. जर कुणाला मूल हवे असेल तर ते त्याना नक्कीच मिळाले पाहिजे. कारण मूल ही दैवी योजना आहे. जर ते तुमच्या आयुष्यात येणं हे तुमच्या नशिबातच लिहिलेलं असेल, तर ते तुम्हाला जरूर मिळेल.”

आणखी वाचा : …म्हणून विद्युत जामवाल आणि अक्षय कुमार हे दोन अ‍ॅक्शन हिरो येणार एकत्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

अभिनेता विद्युत जामवाल फॅशन डिझाईनर नंदिता महतानीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला. त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करत त्यांनी साखरपुडा केल्याचे जाहीर केले होते. त्याआधी ती दोघे एकमेकांना डेट करत असल्याची कोणालाही कल्पना नव्हती.

Story img Loader