दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा ‘लाइगर’ या चित्रपटातून हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या खाली बनलेल्या या चित्रपटात विजयबरोबर अभिनेत्री अनन्या पांडेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या विरोधातसुद्धा बॉयकॉट ट्रेंड सुरू आहे. याच चित्रपटाचा प्रमोशनसाठी विजय आणि अनन्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत, भरपूर मुलाखती देत आहेत. नुकतंच त्यांनी एका डान्स रीयालिटि शोमध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात विजयला त्याची क्रश कोण आहे यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. तेव्हा विजय देवरकोंडाने चक्क २ मराठमोळ्या अभिनेत्रींची नावं घेतली. विजय म्हणाला “मी उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री यांचा खूप मोठा फॅन आहे. मी लहानपणापासून आत्ता पर्यंत त्यांचा प्रत्येक चित्रपट अगदी आवडीने पाहिला आहे. लहानपणी माझा त्यांच्यावर क्रश होता, किंबहुना अजूनही आहेच.”

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Nana Patekar and Aamir Khan News
Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…”
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

याच डान्स रीयालिटि शोमध्ये उर्मिला आणि भाग्यश्री या दोघी समोर बसल्या होत्या. रेमो डिसूझा याच्या डान्स शोमध्ये विजयने ही कबुली दिली. शिवाय विजयने रेमोचेसुद्धा तोंडभरून कौतुक केले. विजय म्हणतो “मी रेमोचाही खूप मोठा चाहता आहे. त्याच्या ‘बदतमीज़ दिल’ गाण्यामधली कोरिओग्राफी पाहून मला या माणसाला भेटायची उत्सुकता आणखीनच वाढली”

आणखीन वाचा : “आपला धर्म…” ‘बॉयकॉट लाइगर’च्या ट्रेंडवर विजय देवरकोंडाचे स्पष्ट विधान

नुकतंच विजयने आमिर खानच्या चित्रपटाला पाठिंबा दिल्याने त्याच्यावर बरेच प्रेक्षक नाराज आहेत. यामुळेच ‘बॉयकॉट लाइगर’ हा ट्रेंडसुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे. ‘लाईगर’ २५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडाने ‘अर्जुन रेड्डी’, ‘डियर कॉमरेड’ अशा वेगवेगळ्या चित्रपटातून स्वतःची छाप चित्रपटसृष्टीवर सोडली आहे.

Story img Loader