दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून म्हणून अभिनेता विजय देवरकोंडाला ओळखले जाते. ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तो कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर तो रिलेशनशीपमध्ये असल्याचीही चर्चा आहे. विजय लवकरच समांथा रूथ प्रभूबरोबर ‘कुशी’ या चित्रपटात झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम कामाला लागली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच्या एका इव्हेंटमध्ये विजयला ‘लायगर’ चित्रपट आणि त्याच्या अपयशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी या प्रश्नाचं अत्यंत स्पष्टपणे विजयने उत्तर दिलं. चित्रपटाचं यश आणि अपयश यामुळे खचून न जाता त्यातून पुन्हा कसं उभं राहायचं याविषयी विजयने त्याचं मत मांडलं.

आणखी वाचा : ‘वेल्कम ३’साठी अक्षय कुमारने घेतलं ‘एवढं’ मानधन; ‘केजीएफ १’ चित्रपटाचं बजेटही पडेल फिकं

‘कुशी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनादरम्यान विजय म्हणाला, “जेव्हा एखादा चित्रपट फ्लॉप होतो तेव्हा नक्कीच वाईट वाटतं. मी याआधी बरेच फ्लॉप चित्रपट दिले आहेत, लायगर हा काही एकमेव फ्लॉप चित्रपट नाही. यापुढेही असेच काही हिट तर काही फ्लॉप चित्रपट मला द्यायचे आहेत, शेवटी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. अपयशाची मला कधीच भीती वाटली नाही.”

‘लायगर’ हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनखाली बनला होता. त्यात विजयसह रम्या कृष्णन, अनन्या पांडे महत्त्वाच्या भूमिकेत होत्या, मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट चांगलाच फ्लॉप ठरला होता. आता विजय आणि समांथाच्या ‘कुशी’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor vijay devarkonda speaks about his first hindi movie liger failure avn
Show comments