Vijay Deverakonda and Ananya Panday’s Liger trailer : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘लाइगर’ (Liger Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील विजयच्या न्यूड लूकने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. चित्रपटाच्या ट्रेलरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस ‘लाइगर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर अवघ्या अर्ध्या तासात १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर सध्या ‘लाइगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – VIDEO : झोप अनावर झाली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील वनिता खरातचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘लाइगर’च्या निमित्ताने विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडाचा डॅशिंग अंदाज थक्क करणारा आहे. यामध्ये तो किक बॉक्सरच्या भूमिकेमध्ये दिसतोय. अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स या ट्रेलरमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. शिवाय अभिनेत्री अनन्या पांडेदेखील या ट्रेलरमध्ये विशेष भाव खाऊन गेली आहे.

पाहा ट्रेलर

विजय देवरकोंडाचे एक्शन सीन्स तसेच त्याचे काही संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहेत. इतकंच नव्हे तर विजयने या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत ट्रेलर पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते. मराठमोठा अभिनेता मकरंद देशपांडे, अमेरिकन किक बॉक्सर माइक टायसन देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.

आणखी वाचा – VIDEO : सात वर्षांपूर्वीचा ‘तो’ क्षण अमृता खानविलकर कधीच विसरणार नाही, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरने निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अनन्याचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट असेल. २०२१च्या फेब्रुवारीमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आता हा बहुचर्चित चित्रपट २५ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor vijay deverakonda liger movie official trailer out actress ananya panday lead role in film see video kmd