अभिनेता विजय वर्माची मुख्य भूमिका असलेला ‘डार्लिंग्ज’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस या चित्रपटातील कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र होते. सध्या विजय वर्मा, आलिया भट्ट, शैफाली शाह या तिघांच्याही दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटात पुरुषांवरील हिंसाचार दाखवल्याप्रकरणी ‘डार्लिंग्ज’ बॉयकॉट करा अशी मागणी काही नेटीजन्सद्वारे करण्यात येत होती. त्यामुळे या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच आता प्रमोशन दरम्यान विजयने शाहरुख खानशी संबंधित एक किस्सा सांगितला, जो चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – आधी गेटवरही उभं केलं नाही अन् नंतर…; शाहरुख खानच्या प्रोडक्शन कंपनीने संतोष जुवेकरला केला फोन, नेमकं काय घडलं?

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना विजय वर्माने त्याच्या संघर्षाच्या दिवसातील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “१० वर्षांपूर्वी मी अभिनय करायचे ठरवून मुंबईत आलो. कुटुंबाला सोडून मी घरातून पळून आलो होतो. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतली, अनेक गोष्टींची जोखीम घेतली. पण घरचे आता माझ्या कामामुळे समाधानी आहेत. त्यावेळी मला असे सांगण्यात आले होते की मुंबईत जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणे सोप्पे नाही, तू शाहरुख खान नाहीस आणि आता शाहरुख खाननेच माझी ‘डार्लिंग्ज’ चित्रपटासाठी निवड केली आहे.”

आणखी वाचा – “तू लेखक नाहीस” म्हणत आमिर खानने दिला होता अतुल कुलकर्णींच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला नकार

विजयने अलीकडेच ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असुन, या चित्रपटातून करीना कपूर खान ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

Story img Loader