२८ जून रोजी येथे होणाऱ्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विक्रम गोखले यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ कलाकाराचा गौरव करण्याची संधी आम्हाला मिळाली हा आमचा सन्मान असल्याचे चित्रपट महोत्सवाचे आयोजक संजय शेटय़े यांनी गुरुवारी सांगितले. या चित्रपट महोत्सवादरम्यान मराठी चित्रपटातील दीर्घ योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या चित्रपट महोत्सवात सुमारे १५ चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे शेटय़े यांनी सांगितले.  या महोत्सवात गजेंद्र अहिरे यांच्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटाचा प्रीमियर होणार असल्याचे कोकणी चित्रपट निर्देशक आणि आयोजक ज्ञानेश मोघे यांनी सांगितले.

Story img Loader