दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता विनायकनला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात झळकलेला विनायकन मद्यपान करून पोलीस स्थानकात गोंधळ घालत होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मंगळवारी (२४ ऑक्टोबर रोजी) दारूच्या नशेत गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली.

वनाधिकाऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून स्पर्धकाला केली अटक, ‘ते’ पेंडंट ठरलं कारणीभूत

Suspect related to Babbar Khalsa arrested from Mumbai NIA takes action
बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?
After luring woman for marriage for few years businessman took gold from womans house
११वी प्रवेशात गैरप्रकार करणारे अटकेत; आरोपींमध्ये महाविद्यालयातील दोन लिपिकांचा समावेश
Bollywood Actor Shakti Kapoor.
Shakti Kapoor : शक्ती कपूर यांच्या अपहरणाचा कट फसला; वाँटेडमधील अभिनेत्याची सुटका, पोलिसांची धक्कादायक माहिती
allu arjun jail food
अल्लू अर्जुनला तुरुंगात देण्यात आले होते ‘हे’ अन्नपदार्थ, पुरवण्यात आल्या होत्या ‘या’ सुविधा; वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती
ram gopal varma on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर राम गोपाल वर्मा यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तेलंगणा सरकारने मुद्दाम…”
ravi kishan on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर रवी किशन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी…”

‘पीटीआय’ने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) या बातमीची पुष्टी केली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “केरळ पोलिसांनी दारूच्या नशेत असलेल्या ‘जेलर’ अभिनेता विनायकनला पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी अटक केली आहे.”

दक्षिणेतील व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनीही पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी विनायकनचे फोटोही शेअर केले आहे. “अभिनेता विनायकनला एर्नाकुलम उत्तर पोलिसांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटकेनंतर अभिनेत्याला सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.”

दरम्यान, विनायकनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच चियान विक्रमच्या ‘ध्रुव नटचथिराम’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. तो रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटात झळकला होता. विनायकन हा दक्षिणेतील आघाडीचा अभिनेता असून तो प्रामुख्याने तमिळ व मल्याळम चित्रपटांमध्ये काम करतो.

Story img Loader