छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून विराजस कुलकर्णी ओळखले जाते. विराजस कुलकर्णी हा नुकतंच विवाहबंधनात अडकला. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लगीनगाठ बांधली आहे. काल अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे गेल्या काही दिवसांपासून लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला होता. त्यानंतर काल ३ मे रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मनोरंजन विश्वातील या लोकप्रिय जोडीने लग्नगाठ बांधली आहे. विराजसने त्याच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर त्या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Video : राणादा- पाठकबाईंचा दणक्यात साखरपुडा, एकमेकांना अंगठी घालतानाचा व्हिडीओ व्हायरल
विराजसने शेअर केलेल्या या फोटोत त्या दोघांचा विवाहसोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला आहे. यावेळी शिवानीने दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा केली होती. तर विराजसनेही तिला मॅचिंग असा कुर्ता परिधान केला होता. विराजसने पोस्ट केलेल्या या फोटोत त्या दोघांच्या चेहऱ्यावर छान स्माईल दिसत आहे. ते दोघेही नववधू आणि वराच्या वेशात फार छान दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
“किचन कल्लाकारच्या मंचावर करायचं आम्हाला श्रीखंड…”, विराजसने शिवानीसाठी घेतला हटके उखाणा
दरम्यान विराजस आणि शिवानी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सध्या या दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही काही दिवसांपासून व्हायरल होत होती. विराजस कुलकर्णीने माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटात काम केले आहे. तर शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी शेवटी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत दिसली होती.