छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून विराजस कुलकर्णी ओळखले जाते. विराजस कुलकर्णी हा काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकला. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लगीनगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विराजसने त्याची आई आणि बायको यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
विराजस कुलकर्णी हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या मृणाल कुलकर्णी यांचा तो मुलगा आहे. विराजसने लहानपणापासून आईला अभिनय करताना पाहिलं आहे. तर दुसरीकडे त्याची पत्नी शिवानी रांगोळे देखील चांगलीच प्रसिद्ध आहे. विराजस कुलकर्णीची आई आणि बायको यांचे नाते फार घट्ट आहे. शिवानी रांगोळेचं आपल्या सासूशी अर्थात अभिनेत्री मृणाल कुलकर्णीशी फार सुंदर कनेक्शन आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कविता कोपरकर यांच्या प्रथा या ब्रँडसाठी त्यांनी फोटोशूट केलं आहे.
“…त्यादिवशीही मला शूटींगला आल्यासारखं वाटत होतं”, विराजसने सांगितला लग्नादरम्यानचा ‘तो’ किस्सा
याची जाहिरात पुण्यात ठिकठिकाणी लावण्यात आली आहे. नुकतंच विराजसने या जाहिरातीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या पाहायला मिळत आहे. त्यासोबत त्याने स्वत:चा एक फोटोदेखील शेअर केला आहे. यात तो या जाहिरातीसमोर उभा असल्याचे दिसत आहे.
याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “हल्ली City Pride Kothrud ला गेलो की अचानक घरीच असल्यासारखं वाटतं…!” असे तो म्हणाला. विराजसच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट केली आहे. फार मस्त कॅप्शन आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एकाने कमाल आहेस तू अशी कमेंट केली आहे. दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
“मी तीन दिवस सलग झोपलो नाही कारण…”, विराजस कुलकर्णीची ‘ती’ पोस्ट व्हायरल
नुकतंच विराजसच्या ‘मिकी’ या विनोदी नाटकाचा प्रयोग पुण्यात पार पडला. या नाटकात विराजसनं सखाराम चव्हाण हे पात्र साकारलं आहे. तर शिवानी ही लवकरच ‘SHE’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.