बॉलिवूड क्वीन कंगना रणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून या चित्रपटाबद्दल वेळोवेळी नवीन अपडेट्स समोर येत होते. तर यातील कलाकारांच्या भूमिका आणि त्यांचा लूकही एकेक करून आउट केला जात होता. मिलिंद सोमण, अनुपम खेर, महिमा चौधरी यांसारख्या कलाकारानंतर आता एका नव्या कलाकाराचा लूक चर्चेत आला आहे.
कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी चित्रपटात संजय गांधींची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता विशाक नायर साकारणार आहे. संजय गांधींच्या भूमिकेतील विशाक नायरची सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे. नेटकऱ्यांनी असं सांगितले की विशाक नायरची निवड योग्य आहे. संजय गांधी इंदिरा गांधींचे कनिष्ठ पुत्र. संजय गांधी धडाडीचे नेते होते. ते स्वतः पायलट होते. दुर्दैवाने विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते.
“बॉयकॉट बॉलिवूडचा परिणाम तंत्रज्ञांवर.. ” अभिनेत्री पल्लवी जोशी यांची प्रतिक्रिया चर्चेत
विशाक मल्याळम चित्रपटात दिसला आहे. २०१६ मध्ये आलेल्या ‘आनंदम’ या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. त्याने अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशाक मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘तोहफा’ आणि ‘रात’ या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. त्याचे चाहते आता त्याला संजय गांधींच्या भूमिकेत बघण्यासाठी आतुर आहेत.
कंगना रणौत स्वतः ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल.