तमिळ चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाणारे अभिनेते विश्वेश्वर राव यांचे २ एप्रिल रोजी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर कर्करोगासंदर्भात उपचार सुरू होते. ते ६४ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वेश्वर राव गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विश्वेश्वर राव यांनी वयाच्या सहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. सूर्याच्या ‘पिठामगन’मध्ये लैलाच्या वडिलांच्या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. याशिवाय माधवनच्या ‘इव्हानो ओरुवन’मधील भूमिकेसाठीही ते ओळखले जायचे. विश्वेश्वर राव यांनी फक्त तमिळच नाही तर अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या. त्यांनी त्यांच्या जवळपास ६० वर्षांच्या करिअरमध्ये ३०० चित्रपटांमध्ये काम केलं, यात त्यांनी अगदी सहाय्यक भूमिकांपासून ते विनोदी भूमिकाही केल्या. त्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त मालिकांमध्येही काम केलं.

“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”

तमिळ चित्रपटसृष्टीने गेल्या काही दिवसांत तीन अभिनेते गमावले. विनोदी अभिनेते सेशू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आठवडाभरातच अभिनेता डॅनियल बालाजीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आता विश्वेश्वर राव यांची कॅन्सरवरील उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.