लोकप्रिय टीव्ही शो ‘मधुबाला’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता विवियन डिसेना आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी विवियनचा घटस्फोट झाला होता. पण तो लवकरच पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. मागच्या काही काळापासून विवियन एक इजिप्तची पत्रकार नौरान अलीला डेट करत आहे आणि लवकरच तो तिच्याशी लग्न करणार आहे. सध्या लग्नाच्या वृत्तामुळेच विवियन सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

विवियनच्या मते, त्याला त्याचं खासगी आयुष्य सर्वांसमोर जाहीरपणे मांडायला आवडत नाही. त्यामुळे तो लग्नाची कोणत्याही प्रकारची जाहीर घोषणा करणार नाही किंवा पत्नीसोबत कोणत्याही इव्हेंटमध्ये अथवा शोमध्ये सहभाही होणार नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवियनची गर्लफ्रेंड नौराननं त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल आणि लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. यावेळी तिनं काही खुलासे देखील केले.

आणखी वाचा- “तिने तब्बल ८ दिवस…” मुनव्वर फारूखीनं सांगितलं आईच्या निधनाचं धक्कादायक सत्य

एका मुलाखतीत नौरान म्हणाली, ‘माझं या देशावर आणि देशातल्या कलाकारांवर खूप प्रेम आहे. त्यामुळेच मी विवियनला एका मुलाखतीसाठी विचारलं होतं. तो एका इव्हेंटसाठी इजिप्तला येणार होता. तेव्हा मी त्याला मुलाखतीसाठी विचारलं होतं. पण पहिल्या भेटीच्या वेळी, ‘हा माणूस स्वतःला काय समजतो?’ असं माझं त्याच्याबद्दलचं इंप्रेशन होतं. त्याचवेळी मी त्याला सांगितलं की मी तुझ्यासारख्या व्यक्तीसोबत डील करू शकत नाही. त्यावेळी तो मला म्हणाला, ‘तू माझ्याबद्दल जो विचार करतेस तसा मी अजिबात नाहीये. तू जसं मला ओळखू लागशील तेव्हा तुला कळेल ही गोष्ट.’ आणि जेव्हा मी त्याच्याबद्दल आणखी जाणून घेऊ लागले तसं मी त्याच्या प्रेमात पडू लागले.’

आणखी वाचा- KGF: Chapter 2 पाहिल्यानंतर कंगना रणौतची यशसाठी खास पोस्ट, अमिताभ बच्चन यांच्याशी केली तुलना

नौरान अलीबद्दल बोलताना विवियन सांगतो, ‘नौराननं तिचा जॉब सोडला आहे आणि होममेकर होणं ही तिची स्वतःची इच्छा आहे. तिच्या कुटुंबातील सर्वच लोक पेशानं वकील आहेत. टीव्ही इंडस्ट्रीशी त्यांचा काहीच संबंध नाही. तिच्या कुटुंबीयांनी मला त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यास सांगितलं आहे. त्यांना वाटतं की आम्ही एका नार्मल पती-पत्नीप्रमाणे राहावं. एवढंच नाही तर नौराननं मला अट घातली आहे की, मी तिला कोणत्याही इव्हेंट किंवा शोमध्ये घेऊन जाण्याचा आग्रह करू नये. त्यामुळे जर मी एखाद्या इव्हेंटमध्ये एकटा दिसलो तर माझ्या वैवाहिक आयुष्यात काही ठिक नाही असा विचार करू नये.’

Story img Loader