प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता युवा राजकुमार घटस्फोट घेत असल्याची माहिती समोर आली आहे. दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार यांचा नातू व अभिनेते राघवेंद्र राजकुमार यांचा मुलगा युवा याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं असून आता त्याने लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे. युवा व श्रीदेवी बायरप्पा यांचा संसार अवघ्या पाच वर्षातच मोडला आहे. युवाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं कळत आहे.

युवा राजकुमार आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांच्याही नात्यात काहीच सुधारणा न झाल्याने आता युवाने घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. श्रीदेवीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. युवाने सात वर्षांच्या मैत्रीनंतर वयाच्या २६ व्या वर्षी वडिलांचा विरोध पत्करून प्रेम विवाह केला होता. आता युवाने पत्नीवर क्रूरतेचे आरोप करत हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात पिंकव्हिलाने वृत्त दिलंय.

actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

‘युवा’ च्या रिलीजवेळी अभिनेत्याबरोबर नव्हती श्रीदेवी

२६ मे २०१९ रोजी लग्न युवा राजकुमार आणि श्रीदेवी बायरप्पा यांनी लग्नगाठ बांधली होती. या जोडप्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता, असं म्हणतात. युवा सिनेमाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमात हे जोडपं एकत्र दिसलं होतं. मात्र, ‘युवा’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी श्रीदेवी दिसली नाही. तेव्हाही या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा झाली होती, पण या दोघांनी त्याबद्दल बोलणं टाळलं होतं.

कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ने चौथ्या दिवशी केली दमदार कमाई, चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

युवा राजकुमारने पत्नीवर केलेत आरोप

आता युवा राजकुमारने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. यावरून आता अभिनेत्याने पत्नीसोबतचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट झालं आहे. युवाव राजकुमारने पत्नी श्रीदेवी बायरप्पा हिच्यावर क्रूरतेचे आरोप केले आहेत. त्याच आरोपांच्या आधारावर त्याने घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. अशातच श्रीदेवीने एक पोस्ट केली आहे.

एका नातेवाईकाने रंगावर कमेंट केली अन् अक्षय कुमारची लेक…; ट्विंकल खन्ना प्रसंग सांगत म्हणाली, “एका मूर्ख…”

वडिलांचा विरोध पत्करून अभिनेत्याने श्रीदेवीशी केलं होतं लग्न

एशियानेट न्यूजच्या वृत्तानुसार, युवा राजकुमारने वडील राघवेंद्र राजकुमार यांचा विरोध पत्करून श्रीदेवी बायरप्पाशी लग्न केलं होतं. दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमाने या जोडप्याला पाठिंबा देत त्यांचं लग्न लावून दिलं होतं. पण दोघेही हे लग्न टिकवू शकले नाही आणि आता अवघ्या पाच वर्षातच हे जोडपं घटस्फोट घेत आहे.

Story img Loader