‘आम आदमी पार्टी’च्या नव्या विचारांनी प्रभावित होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूड कलाकारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अभिनेत्री गुल पनागला चंदीगढमध्ये आपल्याच सहकलाकारांकडून दगाफटका झाला. लखनौमधून ‘आप’चे उमेदवार अभिनेता जावेद जाफरी पराभूत झाला. तर बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याविरूध्द निवडणूक लढवणारा अभिनेता नंदू माधव आणि अहमदनगरमधील उमेदवार अभिनेत्री दिपाली सय्यद हेही अपयशी ठरले आहेत. काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे सगळेच कलाकार मोदी लाटेत वाहून गेले आहेत. यात प्रामुख्याने अभिनेता राज बब्बर, भोजपुरी अभिनेता रवी किशन, यांचे नाव घ्यावे लागेल. बिहारमधून जनता दलतर्फे निवडणूक लढविणारे दिग्दर्शक प्रकाश झा दुसऱ्यांदा पराभूत झाले असून मनसेच्या उमेदवारीद्वारे राजकारणात मराठीचा झेंडा रोवू पाहणारे महेश मांजरेकरांनाही यश मिळवता आलेले नाही. एकूणच, मोदींच्या आधाराने राजकारणात उडी घेणाऱ्या कलाकारांना ही निवडणूक लाभदायी ठरली आहे.

Story img Loader