अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षयकुमार या मोठमोठय़ा अभिनेत्यांच्या आवाजातल्या जाहिराती मराठीत ऐकून आपण आश्चर्यचकित होतो. पण मराठीतला तो आवाज त्यांचा नसतो तर तो असतो गणेश दिवेकर या अवलियाचा.

गणेश दिवेकरला स्वत:चा आवाज तर आहेच त्याशिवाय तो अमिताभ बच्चनपासून ते महेंद्रसिंग धोनीपर्यंत आणि अक्षयकुमारपासून विराट कोहलीपर्यंत अनेक सुपरस्टार, तसंच सेलिब्रेटीजचा तो आवाज बनला आहे. त्याचा व्यवसाय आहे जाहिरातींसाठी आणि सिनेमा व सिरियलसाठी डिबग करणे. आपण टीव्हीवर अनेक सुपरस्टार किंवा क्रिकेटर्सच्या जाहिराती पाहतो. जाहिरातींमध्ये ते शुद्ध मराठीमध्ये बोलतात. तो आवाज असतो गणेशचा!! त्याच्या या कलेचं त्याने व्यवसायात रूपांतर कसं केलं, मुळात तो हे सगळे आवाज कसे काढतो, अशा अनेक बाबींविषयी-

* तू कोणकोणत्या कलाकार आणि क्रिकेटर्सच्या जाहिराती डब केल्या आहेत?
मी अमिताभ बच्चन यांची  कल्याण ज्वेलर्स जाहिरात डब केली आहे. त्यांचा टीव्हीवर जो मराठी आवाज ऐकू येत आहे तो माझा आहे.  अक्षयकुमारच्या हिरो होंडा, स्ट्रिक्स  हेअर कलर, शॉट या जाहिराती तर शाहरुख खानची दोन भूमिका असलेली डर्मी कूलची जाहिरात मीच डब केली आहे. शाहरुखच्याच लक्स, रिलायन्स जिओ जाहिराती केल्या. सफ अली खानच्या अमूल माचो, हेड अँड शोल्डर्स, फेअर अँड हँडसम या आणि आमीर खानच्या स्नॅपडील, टाटा इनोव्हा, टायटन वॉच या जाहिराती मराठीमध्ये मी डब केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या लावा फोन, डाबर च्यवनप्राश, टीव्हीएस व्हिक्टर या जाहिराती महाराष्ट्रात गाजल्या. मी धोनीचाही आवाज काढू शकलो याचा आनंद मला झाला. मग युवराज सिंग, विराट कोहली यांचे मराठी संवाद मी डब केले.  हे सर्व स्टार किंवा क्रिकेटपटू टीव्हीवर बोलताना दिसतात. त्या वेळी त्यांच्या आवाजाची ढब मी नीट समजून घेतो. शिवाय, जेव्हा एखादी जाहिरात मराठीमध्ये डब होते तेव्हा तिचा िहदी व्हिडीओ दिला जातो. िहदीमध्ये बऱ्याच वेळा या कलाकारांनी स्वत: डिबग केलेलं असतं. ते ऐकून तसाच आवाज काढायची आता मला सवय झालीय.

07-lp-ads

* सर्वात आव्हनात्मक जाहिरात कोणती होती?
अक्षयकुमारची हिरो होंडा जाहिरात चांगलीच आव्हानात्मक होती. कारण अक्षयने या जाहिरातीमध्ये तीन मुले आणि त्यांचे वडील अशा चार भूमिका केल्या आहेत. हे चारही आवाज काढणं तसं आव्हानात्मक होतं. कारण तीन भावांचे आवाज होतेच, पण वयस्कर अक्षयचा आवाजही मला काढायचा होता. मी अक्षयकुमारने स्वत: डब केलेली िहदी जाहिरात नीट ऐकली-पाहिली आणि मग वयस्कर अक्षयचाही आवाज काढला. दुसरी आव्हान देणारी जाहिरात होती पॅन्टीनची. यात करण जोहर आहे. करण दिग्दर्शक आहे. त्यामुळे त्याचा आवाज लोकांना इतर स्टारइतका परिचित नाही. म्हणून मी त्याचे काही व्हिडीओ पाहिले. त्याचा आवाज नीट जाणून घेऊन मराठीमध्ये त्याला डब केलं. अक्षयची शॉट जाहिरात मी तामिळ, तेलगू, कन्नड, बंगाली भाषेतही केली.

* या भाषा तुला जमल्या कशा?
डब करताना त्या त्या भाषांच्या लेखकांनी लिहिलेले संवाद मी त्यांच्याकडूनच शिकलो. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. तो जाणून घेतला आणि त्या त्या भाषांमध्ये अक्षयकुमारला डब केलं.

* तू डॉक्टर. मग तो पेशा सोडून या निराळ्या व्यवसायात करिअर करावंसं का वाटलं?
मी शाळेत असताना कार्टून्स पाहायचो आणि तसे आवाज काढण्याचा प्रयत्न करायचो. हीमॅन, स्केलेटॉल अशा मालिका तेव्हा आवडीने पाहत असे. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करताना अभिनय करत होतो. विनय आपटे यांच्या संपर्कात आलो तेव्हा तुझा आवाज चांगला आहे, डिबग व्यवयसायात करिअर कर असा सल्ला त्यांनी दिला. मग अजित भुरे, स्वाती सुब्रमण्यम, नीलिमा दामले, विनोद कुलकर्णी अशा डिबग आर्टस्ट्सिशी ओळख झाली आणि मी डॉक्टरी पेशा सोडून या व्यवसायात आलो.

* कोणत्या अभिनेत्यासोबत खरोखर काम करायची संधी मिळाली?
मी ‘वासुदेव बळवंत फडके’ हा सिनेमा िहदीमध्ये लिहिला. तेव्हा त्यात अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला होता. तेव्हा त्यांच्यासोबत काम केलं. सलमान खानला मराठी संवाद शिकवले आणि अजय देवगणच्या ‘टूनपुरका हिरो’ चित्रपटात एकूण सहा व्यक्तिरेखांसाठी डब केलं. ‘बाहुबली’ चित्रपटात एक व्यक्तिरेखा डब केली. हे सर्व कलाकार अगदी व्यावसायिक पद्धतीने काम करतात. त्यामुळे त्यांचा आवाज जाणून घेताना इतर गोष्टीही शिकता आल्या.

* लहान मुलांसाठी काय काम केलं आहेस?
हे क्षेत्र असं आहे जिथे लहान मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा होतेच. खरं सांगायचं तर लहान मुलांना काम आवडलं तर आपण चांगले कलाकार झालो असं मनात येईल. मी जेमी लान्सेस्टर, मोटू पतलू, चाचा भतिजा अशा काही अ‍ॅनिमेशन सिरीज केल्या. या लहान मुलांना खूप पसंत पडत आहेत. त्यामुळे बालप्रेक्षकांसाठी काही करण्याचा आनंद मिळतोच आहे. आणखी एक गोष्ट अशी की नवी पिढी डिबग व्यवसायात करिअर करू पाहत आहे. ज्यांच्यात खरोखर कलागुण आहेत त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून ‘असोसिएशन ऑफ व्हॉइस आर्टस्टि’ ही संस्था डिबगचं प्रशिक्षण देत आहे. माझ्या अनुभवाचा नव्या पिढीला उपयोग व्हावा यासाठी माझंही योगदान मी देत आहे.

* डिबग करताना अभिनेता मागे पडला असं वाटतं?
नाही, उलट अभिनयाच्या कौशल्याला आणखी पाठबळ मिळालं. माझा मुख्य भूमिका असलेला ‘जानोगे नाही तो मानोगे कैसे’ चित्रपट प्रदíशत होण्याच्या मार्गावर आहे. तसेच, ‘भावेश जोशी’ या सिनेमातही माझी भूमिका असून या सिनेमाचं चित्रीकरण चालू आहे. डिबग करताना माइकसमोर अभिनय करावा लागतो. त्या वेळेस फक्त आवाज रेकॉर्ड होत असतो इतकाच फरक आहे. त्यामुळे डिबग कलाकार पुढे उत्तम अभिनेते बनतात असं नेहमी दिसून येतं.

सौजन्य : लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com