बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन हे रिल लाइफसोबतच रियल लाइफमध्येही हिरो आहेत. आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा ते नेहमीच आदर करतात. त्याचमुळे ते आपल्या चाहत्यांची भेट घेण्यासही चुकत नाहीत. अशाच एका त्यांच्या ९८ वर्षीय चाहतीची त्यांनी भेट घेतली.

‘युद्ध’ या सोनी टीव्हीवरील मालिकेत बिग बींच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहाना कुमरा हिच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या या चाहतीची भेट घेतली. आहानाच्या एका मैत्रिणीची आजी अमिताभ यांची खूप मोठी चाहती आहे. आहाना आणि बिग बींची चांगली ओळख असल्यामुळे तिच्या मैत्रिणीने आपल्या आजीची आणि त्यांची एकदा तरी भेट घडवून द्यावी अशी विनंती तिच्याकडे केली होती. त्यावर आहानाही तिला नाही म्हणू शकली नाही आणि तिने बिग बींशी संपर्क साधला. आपल्या चाहत्यांवर अतोनात प्रेम करणाऱ्या बिग बींनीही त्यांना भेटण्यास लगेच होकार दिला.

वाचा : …या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलंय गंभीर आजाराचं दडपण

अमिताभ कामात किती व्यस्त असतात हे काही नव्याने सांगायला नको. असे असतानाही त्यांनी आपल्या कामातून वेळ काढून ९८ वर्षीय आजींची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाहता आजींनी आपल्या आवडत्या अभिनेत्याशी बऱ्याच गप्पा मारल्याचे दिसते. तसेच, त्यांनी बिग बींना काहीतरी भेटवस्तू दिल्याचेही दिसून येते.

वाचा : ‘गाव गाता गजाली’ची टीम पोहोचलीये या निसर्गरम्य गावात

याविषयी आहाना म्हणाली की, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महान अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजते. माझ्या मैत्रिणीने तिच्या आजीची बिग बींना भेटण्याची एकमेव इच्छा असल्याचे मला सांगितले. त्यानंतर मी बिग बींच्या टीमशी संपर्क साधला आणि त्यांनी लगेच मला भेटण्याची वेळही दिली. त्यादिवशी मला एका नाटकासाठी जायचे होते, त्यामुळे मी तेथे उपस्थित राहू शकले नाही.

Story img Loader