प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिचे निधन झाले आहे. वयाच्या २४ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. यानंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एंड्रिला शर्मा हिला १ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला इंट्राक्रॅनियल हॅम्रेज झाले होते. त्यानंतर मेंदूच्या डाव्या भागात फ्रंटोटेम्पोरोपॅरिएटल डी-कंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करावी लागली होती. आनंदबाजार डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, एंड्रिलाच्या नवीन सीटी स्कॅन अहवालात तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचं दिसून आलं होतं. जिथं तिचं ऑपरेशन झालं होतं, त्याच भागात गाठी आल्या असल्याने डॉक्टरांनी त्या कमी करण्यासाठी नवीन औषधं दिली होती, पण संसर्ग धोकादायक स्थितीत पोहोचला होता. अशातच आता तिला हृदयविकाराचे अनेक झटके आले. त्यामुळे तिची प्रकृती खालावत गेली. तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.
आणखी वाचा : अभिनेत्री एंड्रिला शर्माची मृत्यूशी झुंज अयशस्वी, २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोलकाता हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला सीपीआर देण्यात आला होता. पण त्यानंतर तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. तिची प्रकृती खूपच नाजूक होती. मृत्यूशी लढा देणाऱ्या एंड्रिला शर्माची ही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
तिच्या निधनानंतर तिच्या इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. यात तिने तिचा बॉयफ्रेंड सब्यसाची चौधरी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सब्यसाची चौधरी याचा वाढदिवस ३१ ऑक्टोबरला असतो. यानिमित्ताने एंड्रिलाने एक पोस्ट शेअर केली होती.
एंड्रिलाने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ते दोघेही आनंदात दिसत आहे. यात तिने “माझ्या जगण्याचे कारण…” अंस कॅप्शन देत सब्यसाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. एंड्रिलाची ही पोस्ट २० दिवसांपूर्वीची आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. एंड्रिलाच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचे चाहते विविध पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
दरम्यान अभिनेत्री एंड्रिला शर्माचा जन्म पश्चिम बंगालमधील बेरहामपूर येथे झाला. तिने झुमूर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर ती महापीठ तारापीठ, जीवन ज्योती (Jibon Jyoti) आणि जीवन काठी (Jiyon Kathi) यासारख्या शोमध्ये झळकली. त्याबरोबर तिने अमी दीदी नंबर 1 आणि लव्ह कॅफे यासारख्या चित्रपटातही काम केले.