बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माने चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय तिने ओटीटीवरही पदार्पण केलं. कामामुळे चर्चेत असणारी एंड्रिला आता गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे एंड्रियाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या तरी तिची प्रकृती नाजूक असल्याचं बोललं जात आहे. तिचे चाहते एंड्रियाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – डाएट बदलल्यामुळे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या पत्नीचं निधन, ४३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एंड्रिलाने याआधी दोन वेळा कर्करोगशी झुंज दिली. तिने कर्करोगावर मात करत पुन्हा नव्याने कलाक्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण आता पुन्हा एकदा तिला आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एंड्रिलाला स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा झटका आला आहे. तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या आहेत. यामुळे तिला बराच त्रास सहन करावा लागत आहे. सध्यातरी एंड्रिलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

आणखी वाचा – दक्षिण कोरियातील हॅलोवीन पार्टीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत प्रसिद्ध गायक-अभिनेत्याचा मृत्यु, २४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हावडा येथील खासगी रुग्णालयामध्ये सध्या एंड्रिलावर उपचार सुरु आहेत. वयाच्या विशीमध्ये तिला आरोग्यविषयक समस्यांचा बराच सामना करत आहेत. अलिकडेच तिने दोन ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. ‘ibon Jyoti’, ‘Jiyon Kathi’ सारख्या बंगाली मालिकांमध्ये तिने काम केलं.

Story img Loader