तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला. सध्या अक्षया आणि हार्दिक हे एकमेकांना वेळ देताना दिसत आहे. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात चांगलेच गुंतले आहेत. नुकतंच अक्षयाने हार्दिकसाठी खास उखाणा घेतला आहे.
अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्यानंतर दोघांची लव्हस्टोरी चांगलीच खुलून आली आहे. ते दोघेही सतत एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतंच अक्षयाने एका कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिच्या कुटुंबातील काही सदस्यांनी अक्षयाला उखाणा घेण्यासाठी आग्रह केला. तिनेही त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत लाजत मुरडत खास उखाणा घेतला. याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओ उखाणा घेत अक्षया म्हणते, ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, हार्दिक रावांच नाव घेते कारण तो आहे माझा होणारा नवरा’. अक्षयाच्या या भन्नाट उखाण्यानंतर तिच्या सगळ्या पाहुण्यांनी तिचे कौतुक केले आहे.
अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. हार्दिक जोशीनेही त्यावर कमेंट केली आहे. त्यावर त्याने हात जोडतानाचा आणि हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.
Video : “आमच्या दोघांचा…”, राणादासोबत साखरपुडा झाल्यानंतर पाठकबाईंची खास पोस्ट
दरम्यान अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले होते. यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला होतो. याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होतो. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं होते.