‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. ३ दिवसातच ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरातून २०० हून अधिक कोटी रुपये कमावले आहेत. सोशल मीडियावरूनही प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओत आलियाने फोटोग्राफर्सची माफी मागितली आहे.

आणखी वाचा : “ती सगळी आकडेवारी खोटी…” पीव्हीआरच्या सीईओंनी केला ‘ब्रह्मास्त्र’बद्दल मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वीच आलिया भट्टने ती आई होणार असल्याची बातमी शेअर केली. तरीदेखील गेल्या काही दिवसांपासून ती ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. विविध शहरांमध्ये जाऊन ती या चित्रपटाचे प्रमोशन करत होती. या काळात अनेक कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली. दरम्यानच्या काळात अनेकदा आलियाला कंबरदुखीचा त्रास होत असूनही ती प्रमोशन करताना दिसली. तर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती नुकतीच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफीसबाहेर दिसली. गाडीत बसलेली आलिया चेहऱ्यावरून दमलेली दिसत होती. आलियाला पाहून तिथे असलेले फोटोग्रफार्स तिचे फोटो काढण्यासाठी धावले. त्यावेळी त्यांनी आलियाला गाडीतून बाहेर येत फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. परंतु आलियाने त्या सर्वांची माफी मागितली आणि त्यांना म्हणाली की, “मला माफ करा, मी आत्ता चालूही शकत नाही. त्यामुळे मी गाडीतून बाहेर येत नाहीये. तुम्हा सर्वांचे खूप आभार.”

आलिया प्रेग्नंट असल्याने या काळात होणाऱ्या कंबरदुखी, थकवा अशा सगळ्या गोष्टींना सामोरी जात आहे. त्यामुळेच ती गाडीतून बाहेर उतरली नाही. याबद्दल तिने तिथे असलेल्या फोटोग्राफर्सची नम्रपणे माफी मागितली.

हेही वाचा : “चित्रपट सुरू झाला की…” ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाबद्दल नीतू कपूर यांनी दिली प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील बहुचर्चित बिग बजेट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या निमित्ताने आलिया-रणबीर पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकत्र दिसले. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जून अशी तगडी स्टार कास्ट आहे. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयनेदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकणार नाही, असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, सध्या तरी बॉक्स ऑफिसवर ‘ब्रह्मास्त्र’ची जादू पाहायला मिळत आहे.

Story img Loader