सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल लवकरच आई होणार आहे. तिने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी लग्न केलं होतं. त्यांचं लग्न केरळमधील कोची इथं झालं होतं. अमालाचं हे दुसरं लग्न आहे, आता ती लवकरच आई होणार असून तिने बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमालाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गुजरातमधील सुरत इथं पार पडला. जगत गुजराती आहे. फोटोंमध्ये दिसतंय की अमालाने लाल काठ असलेली पांढऱ्या रंगाची सुंदरशी साडी नेसली आहे, त्याचबरोबर तिने एक नेकलेच व मॅचिंग कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. तर जगतने पांढरा कुर्ता घातला आहे. गुजराती पद्धतीने अमालाचं डोहाळे जेवण पार पडलं. यातील दोन फोटोंमध्ये ते पारंपरिक विधी करताना दिसत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

अमालाच्या या पोस्टवर कमेंट्स करून सर्वजण तिला शुभेच्छा देत आहेत. चाहतेही तिच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अमालाने लग्नानंतर दोन महिन्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आई होणार असल्याची गूडन्यूज दिली होती. त्यानंतर आता तिने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी केलं दुसरं लग्न, आता प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; म्हणाली, “मला माहित आहे की…”

अमालाबद्दल बोलायचं झाल्यास ती लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिचं पहिलं लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झालं होतं, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघेही विभक्त झाले. त्यानंतर तिने जगतशी दुसरं लग्न केलं. जगत गोव्यामध्ये एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress amala paul baby shower in gujarati style husband jagat desai photos hrc