हॉलीवूड अभिनेत्री अँबर हर्ड आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढत होते. या गाजलेल्या खटल्याचा निकाल जॉनी डेपच्या बाजूने लागला. त्यानंतर अँबर प्रसिद्धी माध्यमापासून तशी दूरच होती. मात्र आता अँबरच्या बाबतीत एक खास बातमी समोर आली आहे. ‘अ‍ॅक्वामॅन’ चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या ३८ वर्षीय अँबर हर्ड दुसऱ्यांदा आई होणार आहे.

अँबर हर्डच्या घरी नवा पाहुणा येणार ही बातमी तिच्या प्रतिनिधीने ‘पीपल’ मासिकाशी बोलताना दिली आहे. त्यांनी सांगितले, “सध्या अँबरच्या प्रेग्नंसीच्या सुरुवातीचा टप्पा आहे, त्यामुळे यावेळी फारशी माहिती देणं शक्य नाही.” प्रतिनिधी पुढे म्हणाले, “सध्या इतकंच सांगू शकतो की अँबर स्वतःसाठी आणि तिची पहिली मुलगी ओनाग पेजसाठी खूप आनंदी आहे.”

हेही वाचा…खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि जबरदस्त ट्विस्ट; ‘या’ वीकेंडला नेटफ्लिक्सवर पाहता येतील चोरींवर आधारित ‘हे’ पाच सिनेमे

अँबर हर्ड तीन वर्षांच्या मुलीची आई आहे. तिच्या मुलीचे नाव ओनाग पेज असून ती एप्रिल २०२१ मध्ये जन्माला आली होती. या मुलीचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. मात्र, तिच्या दुसऱ्या बाळासाठीही तिने सरोगसीचा पर्याय निवडला आहे की नाही, याबाबत सध्या काही माहिती नाही. अभिनेता जॉनी डेपबरोबर घटस्फोट झाल्यानंतर चार वर्षांनी अँबरने तिच्या मुलीच्या जन्माची बातमी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केली होती. तिने लिहिले होते, “चार वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की मला मूल हवंय, आणि मला हे माझ्या अटींवर करायचं होतं. स्त्रिया आपल्या आयुष्याच्या इतक्या महत्त्वाच्या टप्प्याबाबत स्वतः निर्णय घेऊ शकतात हे मला आता जाणवतं.”

अँबरने सिंगल मदर होण्याच्या निर्णयाचे सामान्यीकरण करण्यासाठी आणि महिलांना मातृत्वाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे पटवून देण्याचे महत्त्व सांगितले होते. ती म्हणाली होती, “लग्नाशिवाय मूल होण या गोष्टीचं सामान्यीकरण होणं आवश्यक आहे.”

हेही वाचा……Yo Yo Honey Singh Famous: हनी सिंगच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंटरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे प्रदर्शित होणार? वाचा

अँबर हर्ड आणि अभिनेता जॉनी डेप २०१५ ते २०१७ दरम्यान वैवाहिक बंधनात होते. त्यांच्या वादग्रस्त नात्याचा शेवट २०२२ मध्ये चर्चित न्यायालयीन प्रकरणाने झाला, तेव्हा जॉनी डेपने अँबर हर्डविरोधात ५० दशलक्ष डॉलरचा मानहानीचा दावा दाखल केला होता. सहा आठवड्यांच्या खटल्याचा निकाल डेपच्या बाजूने लागला, आणि हर्डला १० दशलक्ष डॉलर नुकसानभरपाई व ५ दशलक्ष डॉलर दंडात्मक भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा…Pushpa 2: अल्लू अर्जुनशी एकदाही भेट नाही, तोंडात कापूस ठेऊन डबिंग अन्…; श्रेयस तळपदेने सांगितला अनुभव, म्हणाला…

या चर्चित खटल्यानंतर अँबरने स्पेनमध्ये शांत आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. ती नुकतीच हॅलोविनच्या दिवशी तिच्या मुली ओनागबरोबर ‘ट्रिक ऑर ट्रीटिंग’ करताना दिसली. सध्या तिच्या दुसऱ्या बाळाबद्दल फारशी माहिती उघड झालेली नसली तरी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव करत अँबर आणि ओनागसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader