अभिनेत्री अमिषा पटेलचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. सध्या ती कोणाला डेट करत आहे? याबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे. याआधी अमिषाचं नाव काही व्यक्तींशी जोडलं गेलं. पण आता एका व्हिडीओमुळे तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमिषा एका पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. पण हा अभिनेता नेमका कोण? दोघांनी एकत्र येण्यामागचं कारण काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बासने अमिषाबरोबर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अमिषा-इमरान एकमेकांना ओळखतात. आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे असं अमिषा-इमरान म्हणतात. पण व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून या दोघांमध्ये मैत्रीपलिकडे नातं असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

अल्का याग्निक आणि उदित नारायण यांच्या गाण्यावर अमिषा-इमरान रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इमरानने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “माझी मैत्रीण अमिषा पटेलबरोबर बॉलिवूड गाण्यावर डान्स करणं हा अनुभव मजेशीर होता. हे गाणं अमिषावरच चित्रीत करण्यात आलं आहे.”

आणखी वाचा – Video : रस्त्यालगतच्या दुकानामध्येच काम करू लागला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, नेटकरी म्हणाले, “माणूसकी जपली अन्…”

इतकंच नव्हे तर अमिषाने देखील हा रोमँटिक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. अमिषाचा व्हिडीओ पाहून काहींनी दोघांची जोडी अगदी सुंदर असल्याचं म्हटलं आहे. तसेच अमिषा-इमरान दोघंही या व्हिडीओमध्ये एकमेकांच्या अगदी जवळ येत असल्याचं दिसून येत आहे. पण आपल्या नात्याबाबत अमिषाने अद्यापही मौन पाळणंच पसंत केलं आहे.