अभिनेत्री अमृता उर्फ अन्नपूर्णा पांडेने आत्महत्या केली आहे. ती भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करायची. तिने बिहारमधील भागलपूर इथं शनिवारी आदमपूर घाट रोडवरील दिव्यधाम अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. अमृताला बऱ्याच दिवसांपासून चित्रपटात काम मिळत नव्हतं, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती व त्यातूनच तिने जीवन संपवलं, अशी माहिती समोर येत आहे.
अमृता पांडेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जोगसर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एफएसएल पथकासह घटनास्थळी तपास केला. घटनास्थळावरून तिने गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार अपर्णाने भोजपुरीसह, हिंदी चित्रपट, मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातीमध्ये काम केलंय. यासंदर्भात एबीपी लाइव्हने वृत्त दिलं आहे.
‘आयुष्य दोन बोटींवर चाललं आहे, मी माझी बोट बुडवून मार्ग सुकर केला’, असं व्हॉट्सॲप स्टेटस आत्महत्येपूर्वी अमृताने ठेवलं होतं. जोगसर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी एका महिलेने अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. माहिती मिळताच एसएचओ कृष्ण नंदन कुमार सिंह, एसआय राजीव रंजन आणि शक्ती पासवान घटनास्थळी पोहोचले. फ्लॅटवर पोहोचल्यावर अमृताचा मृतदेह बेडवर पडलेला होता.
बेपत्ता गुरुचरण सिंगचं लग्न अन् आर्थिक अडचणींबाबत कुटुंबियांनी सोडलं मौन, म्हणाले…
कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की दुपारी ३.३० वाजता तिची बहीण अमृताच्या खोलीत गेली, तेव्हा ती फासावर लटकलेली दिसली. कुटुंबियांनी तात्काळ चाकूने गळ्यातील फास कापला आणि तिला स्थानिक खासगी रुग्णालयात नेलं, पण तिला मृत घोषित करण्यात आलं. यानंतर त्यांनी तिला पुन्हा फ्लॅटवर आणलं. अमृता बहिणीच्या लग्नासाठी घरी आली होती, १८ एप्रिलला तिचं लग्न झालं आणि मग अमृता तिथेच थांबली.
‘सैराट’ ला आठ वर्षे पूर्ण! अवघ्या चार कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने जगभरात कमावले होते तब्बल…
अमृताचं लग्न २०२२ मध्ये छत्तीसगडमधील बिलासपूर येथील चंद्रमणी झांगड याच्याशी झालं होतं. तो मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर आहे. त्यांना मुलबाळ नाही. पती मुंबईत निघून आल्यावर तिने हे धक्कादायक पाऊल उचललं. अमृता तिच्या करिअरबद्दल खूप चिंतेत होती. त्यामुळे ती नैराश्यात होती, याबद्दल तिच्यावर उपचारही सुरू होते, असं तिच्या बहिणीने सांगितलं आहे.