राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सध्या त्यांच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आहेत. अमृता फडणवीसांचे ‘मूड बना लिया’ हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला तुफान हिट मिळाल्या आहेत. अमृता फडणवीसांनी स्वतः हे गाणं गायलं असून त्या या गाण्यामध्ये डान्स करतानाही दिसत आहे. या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावरुन त्यांना ट्रोलही केले जात आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी गायलेले ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या चांगलेच हिट ठरताना दिसत आहे. त्यांच्या गाण्याचे कौतुकही होताना दिसत आहे. तर काहींनी या गाण्यावरुन त्यांना ट्रोल केले आहे. नुकतंच अमृता फडणवीस यांनी ‘झी २४ तास’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : ‘मूड बना लिया’ गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती? अमृता फडणवीस म्हणाल्या…

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“मूड बना लिया हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला ते आवडलं. मी त्यात अभिनयही केला आहे. हे गाणं गाताना किंवा त्यात अभिनय करताना त्यात १०० टक्के योगदान द्यायचं हेच मी ठरवलं होतं. यानंतर या गाण्याचे काय होईल, याचा मी विचारही केला नाही.

अनेकदा खूप चांगली गाणी असतात जी अजिबात हिट होत नाही. तर काही गाणी फार ऐकण्यासारखी नसली तरी ती हिट ठरतात. ते एक वेगळं समीकरण असतं. त्यावेळी मी हे गाणं नीट बोलायचं आहे हेच मी ठरवलं होतं. हे गाणं योग्य वेळी आलं आहे. हे गाणं हिट होईल, याची मला कल्पना होती. पण ते किती पटीने याची कल्पना नव्हती. त्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, यासाठी धन्यवाद”, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा : राखी सावंतला वाटतेय लव्ह जिहादची भीती, म्हणाली “आदिलचे कुटुंबीय…”

अमृता फडणवीस यांनी गायलेलं ‘मूड बना लिया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या गाण्याला नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण त्यांचं कौतुक करत आहेत तर काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. यापूर्वीही त्यांची काही गाणी प्रदर्शित झाली होती. ‘मूड बना लिया’प्रमाणेच ती गाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

Story img Loader